आरक्षण असतानाही न दिल्याने 70 वर्षात झालेले आमचे नुकसान भरून देणार का? जरांगे पाटलांचा सरकारला सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | चारही बाजूने मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून षडयंत्र करणे सुरु झाले आहे. मराठ्यांना पूर्वीपासून आरक्षण होते. मात्र, जाणून बुजून आरक्षण दिले गेले नाही. मराठ्यांचे आरक्षण १८०५ पासून होते. जर मराठ्यांचे पुरावे होते तर 70 वर्षे कोणी लपवून ठेवले? मराठे कुणबी नाही मग आता कशा सापडल्या? आमचे 70 वर्षात झालेले नुकसान सरकार भरून देणार का? असा सवाल मनोज जरांगे- पाटील यांनी सरकारला केला.

मनोज जरांगे-पाटील यांच्या सातारा जिल्हा दौऱ्यास काल कराडच्या सभेपासून सुरुवात झाली. कराड येथील मध्यरात्रीच्या सभेनंतर त्यांनी आज साताऱ्यात सभा घेत शिंदे- फडणवीस सरकारला पुन्हा आरक्षणाच्या मुद्यावरून टार्गेट केले. मराठा आरक्षणात नव्हता तर या नोंदी सापडल्या कशा? जर आमच्या नोंदी सापडल्या तर आमचा ७० वर्षात झालेले नुकसान सरकार कसे काय भरून देणार? याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे.

मी म्हणत नाही कि लोकांनी राजकारण करू नका पण अगोदर आपल्या लेकराचं, कुटुंबाचं भलं मग राजकारण करा. १ डिसेंबर पासून सातारा जिल्ह्यात घराघरातून उपोषण सुरु करा. सरकारला पण प्रश्न पडला पाहिजे कि कुठंकुठं आणि किती लोक उपोषणाला बसला आहे? आम्ही आंदोलन केल्यानंतर आता पुरावे मिळायला लागले. 70 वर्षापूर्वी आरक्षण दिले असते तर आज ही वेळ आली नसती. आज मराठ्यांच्या लाखाने नोंदी सापडायला लागल्या आहेत. मराठ्यांना लढायचे माहिती आहे. त्यावेळी पुरावे नाही सापडत म्हणाले आता पुरावे कसे सापडायला लागले. ज्याने लपवले त्यांची नाव समोर आले पाहिजे.

https://www.facebook.com/watch/?v=254814967582915

आता फक्त 24 डिसेंबरची वाट पाहतोय…: जरांगे पाटील

24 डिसेंबरला आपला विजय निश्चित आहे. मराठ्यांनो गाफिल राहू नका. नाहीतर लेकरांचे नुकसान करायला तुम्ही जबाबदार असाल. हैदराबादला समिती नोंदी शोधण्यासाठी गेली. या समितीचा सरकारने अहवाल स्विकारला. ज्या नोंदी मिळतील त्यांना obc मध्ये आरक्षण मिळणार आहे. परंतु मी दोन भावांमध्ये भेद करू शकत नाही, एका भावाला खूश आणि दुसऱ्याला नाखूश करून चालणार नाही. साताऱ्यात 20 हजार नोंदी सापडल्या आहेत.यातच आपले यश आहे. नोंदी नसतील त्याच नोंदीच्या अहवालावर 24 तारखेला सरसकट आरक्षण देणार सांगितले म्हणून उपोषण मागे घेतले. माझा काहीही स्वार्थ नसल्याचे जरांगे पाटील यांनी म्हंटले.