हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा तिसरा टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्यास दि. 15 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यांचा हा दौरा 15 नोव्हेंबर पासून 23 पर्यंत सहा टप्प्यात दौरा होणार आहे. त्यामध्ये जरांगे पाटलांची तोफ हि दि. 18 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असलेल्या सातारा जिल्ह्यातील सातारा, वाई, रायगड सातारा जिल्ह्यात शुक्रवार, दि. 17 नोव्हेंबर रोजी कराड व शनिवार दि. 18 नोव्हेंबर रोजी मेढा व वाई येथे अशा तीन सभा होणार आहेत. कराड येथे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर घेण्यात येणाऱ्या सभेस मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहणार असून याबाबत नियोजन करण्यात आल्याची माहिती समन्वयकांनी आज कराडात पत्रकार परिषदेत दिली.
कराड येथील मराठा समाज बांधव व सभेच्या समन्व्यकांच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी कराड येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे आयोजित केलेल्या सभेबाबत समन्व्यकानी माहिती दिली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून गावोगावी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्यास सुरुवात करणार आहेत. जरांगे पाटील यांच्या दौऱ्यास कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या दर्शनानंतर सुरुवात होणार आहे.
https://www.facebook.com/watch/?v=3529410150663153
असा असेल दौरा
आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटील यांनी याआधी दोन टप्प्यात नागरिकांशी संवाद साधला होता. त्याचाच आता तिसरा टप्पा सुरू होणार आहे. यात 15 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या काळात ते राज्याचा दौरा करणार आहेत.
15 नोव्हेंबर – वाशी, परांडा, करमाळा
16 नोव्हेंबर – दौंडदौं , मायणी
17 नोव्हेंबर – सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर, कराड
18 नोव्हेंबर – सातारा, मेंढा, रायगड
19 नोव्हेंबर – रायगड, पाचाड, मुळशी, आळंदी
20 नोव्हेंबर – सोलापूर, पुणे, चंदननगर, खालापूर, कल्याण
21 नोव्हेंबर – ठाणे, पालघर, नाशिक, त्रिंबकेश्वर
22 नोव्हेंबर – विश्रांतनगर, संगमनेर, श्रीरामपूर
23 नोव्हेंबर – नेवासा, शेवगाव, बोधेगाव, अंतरवाली