मानसी नाईक पुसतेय घरातला पंखा; म्हणून पतीने केले कौतुक तर लोकांनी केले ट्रोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक हिने ”वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणत अगदी भल्या भल्याना वेड लावले आहे. मानसीचे नुकतेच लग्न झाले असून ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आता रिक्षावाला नंतर ”ले ले पंगा” म्हणत घरातल्या पंख्याची साफसफाई करतानाचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ चांगलाच वायरल होत आहे. इतकेच नव्हे तर तिच्या या व्हिडिओवर तिचे चाहते आणि ट्रोलर्स सगळ्यांनीच कमेंट्सवर भर दिला आहे. मुख्य म्हणजे हा व्हिडीओ पाहून मानसीच्या पतीने तिचे कोतुक केले आहे तर नेटकऱ्यांनी बरोबर निशाणा साधत त्यांना ट्रोल केले आहे.

https://www.instagram.com/p/CO0GdZRgEuv/?utm_source=ig_web_copy_link

मानसी नाईकच्या या व्हिडिओसोबत तिने कॅप्शन लिहिले आहे कि, ले ले पंगा. चाहे दुश्मन हो कितना भी पापी, उसके लिए हम अकेले ही है काफी. अगर जिन्दगी इक जंग है.. तो अपना ऍटिट्यूड भी दबंग है. फीलहाल ये जंग भी जितनी है हमें, किरणे भी मेहनत घर पे करनी पडे. शूट का सेट हो या घर का सेट, मेहनत १००%. मिस यु माझ्या राजा.

https://www.instagram.com/p/CNrD9l_g9wT/?utm_source=ig_web_copy_link

या व्हिडीओत ती घरातला पंखा साफ करताना दिसतेय. मुख्य म्हणजे ती हा पंखा कागदाच्या सहाय्याने पुसताना दिसतेय. तिच्या चाहत्यांनी तर या व्हिडिओवर प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. या कमेंट्स करणाऱ्यांमध्ये तिचा पती प्रदीप खरेरा देखील सामील आहे. प्रदीपने कमेंट करीत म्हटले आहे कि, मला तुझा अभिमान वाटतो माझी राणी.. तिचे चाहतेही भरभरून तिचे कौतुक करत आहेत.

   

या व्हिडिओनंतर तिचे चाहते आणि पती सगळेच तीच कौतुक करत आहेत मात्र काहीजण तिची चेष्टा मस्करी करताना दिसत आहे. एका युजरने तर मेकअप लावत पंख्याची साफ सफाई करतेय म्हणत तिची खिल्ली उडविली आहे. तर अन्य एकाने म्हटले कि तुमच्याही पंख्यावर धुळ बसते..? तर एका युजरने तिला पंखा पुसताना टीश्यु पेपर नव्हे कापड वापर असा सल्ला दिला आहे. तर तिचा पती प्रदीपच्या कमेंटवर नेटकरी म्हणतायत, यात काय अभिमान वाटण्यासारखं आहे स्वतःच्याच घरातला पंखा पुसतेय ती. तर अन्य एकाने लिहिले नुसता शो ऑफ करतेय. अश्या पद्धतीने मानसी आणि तिचा पती प्रदीप दोघेही ट्रोल होत आहेत.

Leave a Comment