करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा मोठा निर्णय; गर्दी टाळण्यासाठी मंत्रालयातील कामकाज दोन शिफ्टमध्ये होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | करोनाचा दुसरा स्ट्रेन अत्यंत जोराने वाढत चालला आहे. करोणा व्हायरसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. याची खबरदारी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रालयातील कार्यालयीन वेळा या दोन शिफ्टमध्ये करण्याबाबत नियोजन करा, यासोबतच ‘वर्क फ्रॉम होम’ची परिणामकारक यंत्रणा बसवा. असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्याचा आदेशही यावेळी दिला. मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्टमध्ये कशा बसवता येतील. तसेच ‘वर्क फ्रॉम होम’च्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येईल. करोणाच्या या पार्श्वभूमीवर तात्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री यांनी मुख्य सचिवांना दिल्या. निती आयोगाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री त्यांनी पारंपारिक कार्यालयीन वेळावर पुनर्विचार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

मध्यंतरी लॉकडाउन उघडल्यानंतर मंत्रालयामध्ये दररोज येणाऱ्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. हे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले गेले. यावर चर्चा करून होणाऱ्या गर्दीला प्रवेश निर्बंधबाबत कारवाई करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. मंत्रालयामध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीचे तापमान आणि लक्षणे असल्यास त्यांची तपासणी करण्यात यावी. जेणेकरून करोणा व्हायरसचा रुग्ण मंत्रालयामध्ये येऊ शकणार नाही. यामुळे कोरोनाचा प्रसार होणार नाही. असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

Leave a Comment