हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । द्राक्षे सुकवून मनुका तयार केला जातो. मुनका आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मनुक्यांमध्ये कॅल्शिअम, लोह, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. मनुके खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते तसेच पोटही साफ होते. त्यातही रात्री भिजवून मनुके खाल्ले तर त्याचे भरपूर आरोग्यदायी फायदे होतात. चला याबाबत जाणून घेऊया …
1) राञभर भिजून ठेवलेले मनुके सकाळी खाल्ल्याने तसेच त्यातील पाणी प्यायल्याने त्यामध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडेन्ट कन्टेन्टमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते व व्हायरस आणि बॅक्टरीयापासून संरक्षण मिळते.
2) मनुक्यामध्ये लोह आणि तांबे मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते याशिवाय शरीरातील रक्तही शुद्ध होते.
3) जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी मनुके खाऊ शकता. मनुका पोटातील पाणी शोषून घेतात आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करतात.
4) मनुक्यांमध्ये फायबर आणि कॅलरी जास्त असल्याने हाड मजबूत होते.
5) मनुक्यामध्ये असलेले बीटा कॅरोटीन डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे डोळ्याच्या आरोग्यासाठी नियमितपणे मनुके खावेत.
6) मनुक्यामध्ये असलेल्या फायटोकेमिकल मुळे सर्व प्रकारच्या दातांची समस्या दूर होते.
7) मनुके खाल्ल्यानंतर रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि त्यामुळे हृदय विकाराचा धोका टळतो.