अदानी ग्रुपच्या अनेक कंपन्यामध्ये SEBI आणि DRI ची तपासणी, संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । अदानी ग्रुपच्या अनेक कंपन्या SEBI च्या छाननीखाली आहेत. आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारने सभागृहाला ही माहिती दिली आहे. 19 जुलै रोजी सभागृहात लेखी उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की, अदानी ग्रुपच्या अनेक कंपन्यांची चौकशी SEBI आणि सरकारच्या डायरेक्टोरेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजन्स (DRI) करीत आहेत. या बातमीनंतर अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सने नवीन पातळीवर घसरण निर्माण केली आहे.

चौधरी म्हणाले, “SEBI अदानी ग्रुपच्या अनेक कंपन्यांची चौकशी करीत आहे. कंपन्यांना SEBI च्या नियमांचे उल्लंघन केल्याचा संशय आहे. याशिवाय महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) देखील या कंपन्यांचा तपास करत आहे.” तथापि, एनफोर्समेंट डायरेक्टोरेट (ED) या कंपन्यांचा तपास करीत नसल्याचेही चौधरी यांनी सांगितले.

स्टॉक मार्केटमध्ये अदानी ग्रुपच्या 5 कंपन्या लिस्टेड आहेत. अर्थ मंत्रालयाने असेही म्हटले आहे की,”SEBI ने तीन परदेशी पोर्टफोलिओ फंड अल्बुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड लिमिटेड आणि APMS इन्व्हेस्टमेंट फंडची खाती गोठविली आहेत.” ही बातमी यापूर्वीही आली होती पण त्यानंतर ही खाती फ्रिज केली गेली नाहीत असे NSDL ने स्पष्ट केले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment