मराठा-धनगर एकत्र आल्यास दिल्लीची गादी हस्तगत करु ; महादेव जानकरांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आणि धनगर समाज एकत्र आला तर दिल्लीची गादी हस्तगत करु शकतो, असं मोठं वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी केलं आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समोरच त्यांनी हे विधान केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जानकरांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

जेजुरी गडावरील अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं शरद पवार यांच्या हस्ते अनावरण झालं. या कार्यक्रमाला होळकर घराण्याचे वंशज आणि छत्रपती संभाजीराजे हे देखील उपस्थित होते. यावेळी जानकर बोलत होते. महादेव जानकर यांनी थेट दिल्लीच्या तख्ताचे समीकरण मांडल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मराठा आणि होळकर समाजाची शिवरायांनी सोयरिकीची मोट बांधली होती. याचा आधार घेत जानकरांनी जाणत्या पवारांना दिल्लीची गादी हस्तगत कशी करता येईल, याबाबत सांगितले. आमचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) असला तरी शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले संबंध आहेत. धनगर समाजाला अनुसूचित जातींच्या (ST) सवलती मिळण्यासाठी शरद पवार यांनी आशीर्वाद द्यावेत. मराठा आणि धनगर समाज एकत्र आला तर आपण दिल्लीची गादी हस्तगत करु शकतो, असे जानकर म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment