Wednesday, February 1, 2023

मराठा मंत्र्यांना फक्त आपली पदे टिकवायची आहेत त्यांना आरक्षणात रस नाही : राणेंची ठाकरे सरकारवर टीका

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आता भाजप व महाविकास आघाडी सरकारमध्ये चांगलंच टीकेचं युद्ध पेटलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या शिष्ट मंडळासोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहलेले पत्र राज्यपालांना दिले. यावरून भाजपचे नेते विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काल  टीका केली. त्यांच्यानंतर आज भाजपचे खासदार नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “मराठा मंत्र्यांना फक्त आपली मंत्रीपदे टिकवायची आहेत, त्यांना मराठा समाजाच्या आरक्षणात काहीच रस नाही,” अशा शब्दात खासदार राणेंनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आजी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राज्यातील हे महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठीची आपली जबाबदारी झटकत आहे. वास्तविक पाहता या सरकारची मराठा समाजाला आरक्षण देण्याची मानसिकताच नसल्याचे दिसते. राज्य सरकारने विरोधकांना एकत्र घेऊन बसलं पाहिजे. त्यांच्यासमवेत चर्चा करून आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणीही यावेळी राणेंनी केली.

- Advertisement -

यावेळी राणे म्हणाले कि, ” मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. तरी देखील राज्य सरकार राज्यपाल व पंतप्रधानांना पत्र लिहीत आहे. तसेच राज्यपालांना पत्र लिहीत आहे. या पत्रांची रस्कारकडून का घाई केली जात आहे.? याचा खुलासा त्यांनी करावा. राज्यपालांना पत्र देण्याअगोदर जर सर्व संघटना, विरोधी पक्षनेते यांच्याबरोबर चर्चा केली असती तर बरे झाले असते. या सरकारच्या अशा पद्धतीच्या प्रकाराकडे पाहता आता मराठा समाजातील सर्व संगटनांनी एकत्र यावं, असे आवाहनही यावेळी राणेंनी केले.