#MarathaReservation | बंद मुळे लातुर मधे नेमकं झालं काय ?

क्रांन्ति मोर्चा लातूर
क्रांन्ति मोर्चा लातूर
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
स्थानिक प्रतिनिधी, लातूर

लातूर | शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये बंद कडकडीत स्वरूपात पाळण्यात आला. पहाटेपासूनच शहरात येणार्‍या व शहरातून जाणार्‍या एस.टी. बसेस बंद होत्या. येथील मध्यवर्ती बसस्थानक, बसस्थानक क्र. २ याचे गेट पूर्णपणे बंद करण्यात आले होते. आडत बाजार, पेट्रोल पंप, सिनेमागृह सर्व प्रकारची दुकाने सकाळी पासून बंद अाहेत. मात्र वैद्यकीय सेवा आणि औषधी दुकाने सुरळीत चालू आहेत.

शहरातील नागरीक, विद्यार्थी, नोकरदार यांनाही आजच्या बंदचा फटका बसला आहे. हजारोंच्या संख्येने लातूर शहरात विद्यार्थी आहेत. त्यांना जेवण, नाश्ता मिळालाच नाही. गल्लीबोळातील टपरीदेखील बंद होती. एखाद्या बोळात एखादी टपरी चालू असेल तर तीही कार्यकर्त्यांनी गटागटाने जाऊन बंद केली. आजच्या बंदचे वैशिष्ट्य म्हणजे लातूर शहरात सकाळपासूनच सर्वत्र धूरच धूर दिसत होता. आंदोलनकर्त्यांनी बहुतेक ठिकाणी चौकात, रस्त्यावर जुने टायर जाळून, टेलीफोनचे खांब आडवे टाकून, रस्त्यावर दगड रचून बंद केले. एकही खासगी अथवा शासकीय चारचाकी वाहन रस्त्यावर दिसले नाही. मोटारसायकलीसाठी देखील अनेक रस्ते बंद करण्यात आले होते. कार्यकर्ते मोठ्या संख्येने हातात भगवे ध्वज घेवून टोप्या घालून गटागटाने शहरातून रॅली काढून बंदचे आवाहन करीत होते.
येथील गंजगोलाई परिसरातही कडेकोट बंद पाळण्यात आला. लातूर शहरातील गांधी चौक, हनुमान चौक, गंजगोलाई, गुळ मार्केट, गरूड चौक, बसवेश्‍वर चौक, राजीव गांधी चौक, शिवाजी चौक, अशोक हॉटेल चौक, दयानंद गेट, पीव्हीआर चौक येथे कार्यकर्त्यांनी रस्त्यात ठाण मांडून टायर जाळत रस्ता बंद केला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एकही वाहन जाणार नाही अशा पद्धतीने बंद पाळण्यात आला. रेणापूर फाटा येथे रास्ता रोकोमध्ये सहभागी होण्यासाठी लातूर ग्रामीणचे आमदार त्रिंबक भिसे गेले. मात्र, तिथे एक गट भिसे यांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या गाडीवर तुफान दगडफेक करीत होते. येथे बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान राखून आ. भिसे यांना तेथूनच परत लातूरला सुखरूप पाठविण्यात आले. आ. अमित देशमुख यांनी वासनगाव पाटी येथे रास्ता रोकोत सहभाग घेतला. यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हातात फलक घेवून त्यांनी वासनगाव पाटी व बाभळगाव येथे भेट देवून आंदोलनात सहभाग घेतला.
सबंध जिल्हाभरात मुख्य रस्ते, मोड, चौरस्ता अशा ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी ठाण मांडले होते. त्यामुळे अक्षरशः जिल्हाभरात चक्का जाम असेच वातावरण दिसून येत होते. निलंगा येथे शिवाजी चौकात मराठा क्रांती कार्यकर्त्यांनी आरक्षणासाठी आंदोलन केले. या आंदोलनात अरविंद पाटील निलंगेकर हेही सहभागी झाले होते. दुपारी लातूरचे पालकमंत्री तथा निलंग्याचे आमदार ना. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा येथील शिवाजी चौकात जाऊन तेथील आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांच्या मागण्यांना आपला अक्षरशः व्यक्तीशः पाठिंबा दर्शविला व पालकमंत्री या नात्याने आंदोलनकर्त्यांकडून मागण्यांचे निवेदन स्विकारले. आज लातूर शहर महानगरपालिका कामकाज चालू होते. याच दरम्यान काही कार्यकर्ते पालिकेच्या गेटवर चढून आवारात आले. त्यांनी तिथे उभे असलेल्या पालिका आयुक्तांची कार तसेच अन्य दोन अधिकारी, एक कारकून आणि कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकाच्या गाडीवर दगडफेक करून गाडीचे नुकसान केले. काचा फोडल्या. एवढेच नव्हे तर आंदोलनकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीत दुसर्‍या मजल्यावर असलेल्या पालिका आयुक्तांच्या केबीनच्या खिडक्याच्याही काचा यावेळी फोडण्यात आल्या. आजच्या या बंदला अहमदपूर शहरात देखील गालबोट लागले. तेथील अग्नीशामक दलाच्या गाडीवर तुफान दगडफेक करून गाडीचे मोठे नुकसान करण्यात आले. लातूर शहरामध्ये एका भागात रस्ता बंद असतानाही एक ऑटो मार्ग काढून जात असताना आंदोलनकर्त्यांनी त्या ऑटोस अक्षरशः पलटी केले. दुपारपर्यंत तरी शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत होता.

बंद दरम्यान शहरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्रीपासूनच पोलिस अधिकारी, कर्मचारी, महिला-पुरूष हे गणवेशात बंदोबस्तावर होते. त्यांची मात्र, आज अक्षरशः उपासमार झाली. पाणी पिण्यासदेखील कोठे मिळाले नाही अथवा एखाद्या सामाजिक संस्थेने, दानशुरांनी पोलिसांना खाण्यासाठी म्हणून अन्नाचे पॉकेटदेखील दिले नाही. एखाद्या हॉटेल, टपरीवर जाऊन खावे म्हटले तरी त्यांना खाता आले नाही. बंदोबस्त अत्यंत कडक स्वरूपाचा असल्याने पोलिसांना पॉईंट सोडता आला नाही. आमचा बंद हा शांततेत राहील असे मराठा क्रांती मोर्चाच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले होते. पण, आजच्या बंद दरम्यान काही ठिकाणी जबरदस्ती करण्यात आली. एवढेच नव्हे तर येथील बार्शी रोडवरील एक हॉटेल बंद असतानाही बाजूच्या दारातून जाऊन काही कार्यकर्त्यांनी आतील टेबल व काचेची मोडतोड केल्याचे सांगण्यात येते.या संख्येने लातूर शहरात विद्यार्थी आहेत. त्यांना जेवणा, नाश्ता मिळाला नाही. गल्लीबोळातील टपरीदेखील बंद होती. एखाद्या बोळात एखादी टपरी चालू असेल तर तीही कार्यकर्त्यांनी गटागटाने जाऊन बंद केली. आजच्या बंदचे वैशिष्ट्ये म्हणजे लातूर शहरात सकाळपासूनच सर्वत्र धूरच धूर दिसत होता. आंदोलनकर्त्यांनी बहुतेक ठिकाणी चौकात, रस्त्यावर जुने टायर जाळून, टेलीफोनचे खांब आडवे टाकून, रस्त्यावर दगड रचून बंद केले. एकही खासगी अथवा शासकीय चारचाकी वाहन रस्त्यावर दिसले नाही. मोटारसायकलीसाठी देखील अनेक रस्ते बंद करण्यात आले होते. कार्यकर्ते मोठ्या संख्येने हातात भगवे ध्वज घेवून टोप्या घालून गटागटाने शहरातून रॅली काढून बंदचे आवाहन करीत होते.
येथील गंजगोलाई परिसरातही कडेकोट बंद पाळण्यात आला. लातूर शहरातील गांधी चौक, हनुमान चौक, गंजगोलाई, गुळ मार्केट, गरूड चौक, बसवेश्‍वर चौक, राजीव गांधी चौक, शिवाजी चौक, अशोक हॉटेल चौक, दयानंद गेट, पीव्हीआर चौक येथे कार्यकर्त्यांनी रस्त्यात ठाण मांडून टायर जाळत रस्ता बंद केला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एकही वाहन जाणार नाही अशा पद्धतीने बंद पाळण्यात आला. रेणापूर फाटा येथे रास्ता रोकोमध्ये सहभागी होण्यासाठी लातूर ग्रामीणचे आमदार त्रिंबक भिसे गेले. मात्र, तिथे एक गट भिसे यांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या गाडीवर तुफान दगडफेक करीत होते. येथे बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान राखून आ. भिसे यांना तेथूनच परत लातूरला सुखरूप पाठविण्यात आले. आ. अमित देशमुख यांनी वासनगाव पाटी येथे रास्ता रोकोत सहभाग घेतला. यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हातात फलक घेवून त्यांनी वासनगाव पाटी व बाभळगाव येथे भेट देवून आंदोलनात सहभाग घेतला.
सबंध जिल्हाभरात मुख्य रस्ते, मोड, चौरस्ता अशा ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी ठाण मांडले होते. त्यामुळे अक्षरशः जिल्हाभरात चक्का जाम असेच वातावरण दिसून येत होते. निलंगा येथे शिवाजी चौकात मराठा क्रांती कार्यकर्त्यांनी आरक्षणासाठी आंदोलन केले. या आंदोलनात अरविंद पाटील निलंगेकर हेही सहभागी झाले होते. दुपारी लातूरचे पालकमंत्री तथा निलंग्याचे आमदार ना. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा येथील शिवाजी चौकात जाऊन तेथील आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांच्या मागण्यांना आपला अक्षरशः व्यक्तीशः पाठिंबा दर्शविला व पालकमंत्री या नात्याने आंदोलनकर्त्यांकडून मागण्यांचे निवेदन स्विकारले. आज लातूर शहर महानगरपालिका कामकाज चालू होते. याच दरम्यान काही कार्यकर्ते पालिकेच्या गेटवर चढून आवारात आले. त्यांनी तिथे उभे असलेल्या पालिका आयुक्तांची कार तसेच अन्य दोन अधिकारी, एक कारकून आणि कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकाच्या गाडीवर दगडफेक करून गाडीचे नुकसान केले. काचा फोडल्या. एवढेच नव्हे तर आंदोलनकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीत दुसर्‍या मजल्यावर असलेल्या पालिका आयुक्तांच्या केबीनच्या खिडक्याच्याही काचा यावेळी फोडण्यात आल्या. आजच्या या बंदला अहमदपूर शहरात देखील गालबोट लागले. तेथील अग्नीशामक दलाच्या गाडीवर तुफान दगडफेक करून गाडीचे मोठे नुकसान करण्यात आले. लातूर शहरामध्ये एका भागात रस्ता बंद असतानाही एक ऑटो मार्ग काढून जात असताना आंदोलनकर्त्यांनी त्या ऑटोस अक्षरशः पलटी केले. दुपारपर्यंत तरी शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत होता.
बंद दरम्यान शहरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्रीपासूनच पोलिस अधिकारी, कर्मचारी, महिला-पुरूष हे गणवेशात बंदोबस्तावर होते. त्यांची मात्र, आज अक्षरशः उपासमार झाली. पाणी पिण्यासदेखील कोठे मिळाले नाही अथवा एखाद्या सामाजिक संस्थेने, दानशुरांनी पोलिसांना खाण्यासाठी म्हणून अन्नाचे पॉकेटदेखील दिले नाही. एखाद्या हॉटेल, टपरीवर जाऊन खावे म्हटले तरी त्यांना खाता आले नाही. बंदोबस्त अत्यंत कडक स्वरूपाचा असल्याने पोलिसांना पॉईंट सोडता आला नाही. आमचा बंद हा शांततेत राहील असे मराठा क्रांती मोर्चाच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले होते. पण, आजच्या बंद दरम्यान काही ठिकाणी जबरदस्ती करण्यात आली. एवढेच नव्हे तर येथील बार्शी रोडवरील एक हॉटेल बंद असतानाही बाजूच्या दारातून जाऊन काही कार्यकर्त्यांनी आतील टेबल व काचेची मोडतोड केल्याचे सांगण्यात येते.