सो हॉट..! अभिनेता संतोष जुवेकरची पिळदार बॉडी आणि स्टायलिश लूकचे फोटोशूट झाले वायरल

Santosh Juvekar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। असे अनेक मराठी कलाकार आहेत जे वारंवार चित्रपटांतून भले दिसत नसतील मात्र त्यांची प्रेक्षकांवर पडलेली छाप मात्र कायम असते. एखादे पात्र ती भूमिका प्रेक्षकांना जिवंत वाटावी यासाठी हे कलाकार बरीच मेहनत घेतात. असाच कष्टाळू, मेहनती आणि हरहुन्नरी कलाकार म्हणजे अभिनेता संतोष जुवेकर.  संतोषने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आजकाल संतोष सोशल मीडियावर बराच सक्रीय दिसत आहे. या माध्यमातून तो स्वतःचे फोटो आणि आगामी चित्रपटाविषयी माहिती देत असतो. नुकताच त्याने एक असा फोटो शेअर केला आहे, जो पाहून भले भले चाट पडले असतील. त्याचा हा लूक आणि बॉडी पाहून महिला प्रेक्षक वर्ग तर घायाळ झाला असेल.

https://www.instagram.com/p/CBfyKygDBLx/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेता संतोष जुवेकरने सोशल मीडियावर नुकताच शेअर केलेला हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचा हा हॉट फोटो त्याच्या चाहत्यांना अत्यंत भावला आहे. या फोटोत दिसणारी त्याची पिळदार बॉडी पाहून कुणीही घायाळ होईल. फोटोमधील आकर्षक आणि तितकीच पिळदार बॉडी आणि स्टायलिश लूक सध्या त्याच्या चाहत्यांना चांगलाच भावतो आहे. या फोटोसोबत त्याने, जान हैं तो जहान हैं…… जान सलामत तो प्रोजेक्ट पच्चास!! क्या बोलते भाई लोग…. सहीना ? असे हटके आणि त्याच्या अंदाजातील कॅप्शन दिले आहे.

https://www.instagram.com/p/CPQQXq9Nytk/?utm_source=ig_web_copy_link

तर अन्य एका फोटोसोबत त्याने, लॉकडाऊनंतर पुन्हा एकदा शूटिंगमध्ये व्यस्त व्हायचेय. त्यासाठी तो वर्कआऊट करत पिळदार बॉडी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे, असे कॅप्शन दिले आहे. हा फोटोदेखील पिळदार बॉडी असलेलाच फोटो आहे. त्याचबरोबर लिहीले की, लॉकडाऊन संपणार शूटिंग सुरु होणार!!! तयारीला लागलं पाहिजे बाबा, दुकान टकाटक तरंच गिर्‍हाईक येणार. कसरती, वर्कआऊट, विविध प्रकाराचा व्यायाम तो करतो. संतोष जुवेकरचा हा फोटो पाहून चाहेत लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.