मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो

Sonali Kulkarni
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान उरकले आहे. सोनालीने स्वतः फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. दुबई येथे सोनाली कुणाल सोबत लग्नबंधनात अडकली आहे.

आम्ही जून मध्ये युके ला लग्न करणार होतो. मात्र युकेला आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने लग्न पुढे ढकलावे लागले. नंतर व्हेन्यूच्या उपलबद्धतेनुसार जुलैमध्ये पुढची तारीख ठरली. कुणाल बरोबर बसून लग्नाची तयारी करण्यासाठी मी मार्च मध्ये शूटिंग संपवून दुबईला आले. आणि भारतात कोरोनाची दुसरी लाट आली. अन मी दुबईत अडकले अन लग्नबंधनातही असं सोनालीने सांगीतले आहे.

त्याच झालं असं कि एप्रिल मध्ये युके ने भारतीयांसाठी ट्रॅव्हल बॅन केले. यानंतर क्वारंटाईन, प्रवासावरील निर्बंध, कुटुंबियांसाठीची रिस्क, एकंदरीत होणारा अनावश्यक खर्च, सरकारचे नियम या सर्वांचा विचार करून आम्ही भला मोठा लग्न समारंभ रद्द करण्याचा निर्णय घेतला. जुनंच जुलै असं पोस्टपोन करण्यापेक्षा म्हटलं जुलैच मे करू अन सर्वांना सुखद धक्का देऊ असं सोनालीने आपल्या इंस्टाग्राम पोस्ट मध्ये म्हटले आहे.

https://www.instagram.com/p/CPBEi1QrRTy/?utm_source=ig_web_copy_link