हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आणि देशात कोरोना विषाणूने अक्षरशः कहर केला असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. याच एकत्र येऊन उपाययोजना न करता कोरोनाच्या माध्यमातून अनेक राजकीय नेते आणि पक्ष आपली पोळी भाजण्याचा पयत्न करताना दिसत आहे. करोनाचा वापर राजकारणासाठी करत असल्याचं चित्र सध्या देशात पाहायला मिळत आहे. यावर मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं अतिशय संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
तेजस्विनीनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात तिनं लिहिलं, ‘सगळ्यात मोठी कीड आपल्या देशाला, आपल्याच नाही तर सगळ्या जगाला लागली आहे, ती आहे राजकारण. ही कीड कोविडपेक्षाही भयाण, घातक आणि वर्षानुवर्ष आपल्याला पोखरत जाणारी आहे. या कीडीपासून बचाव करता आला तर बघा. अवघड आहे सगळंच… काळजी घ्या’ देशातील परिस्थिती गंभीर असताना सुरू असलेलं राजकारण पाहता तेजस्विनीची ही पोस्ट सर्वांनाच विचार करायला लावते.
देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 1 कोटी 45 लाख 26 हजार 609 इतका झाला आहे. यापैकी आजपर्यंत 1 कोटी 26 लाख 71 हजार 220 रुग्ण कोरोनावर मात करून बरे देखील झाले आहेत. मात्र, अजूनही देशात 16 लाख 79 हजार 740 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आणि त्यामध्ये रोज नव्या रुग्णांची भर पडत आहेत. त्यासोबतच देशात आजपर्यंत कोरोनामुळे तब्बल 1 लाख 75 हजार 649 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.