मराठवाड्यात लोकसभा उमेदवारांची कोंडी, काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवारच ठरेनात अन् सेना-भाजप निवांत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली असली तरी पहिल्या दिवशी मराठवाड्यात एकाही प्रमुख उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. सर्वच पक्ष उमेदवारांची अंतिम चाचपणी करताना चाचपडताहेत अशीच स्थिती आहे. आयाराम- गयारामांमुळे संभ्रम अधिकच वाढला आहे.

औरंगाबादेत होळीनंतरच प्रमुख पक्ष उमेदवारांची नावे जाहीर करण्याची शक्यता आहे. चंद्रकांत खैरेंविरुद्ध आघाडीतर्फे कोण लढणार; हे अद्यापही ठरत नाही. एमआयएमने स्वतंत्र उमेदवार दिल्यास वंचित बहुुजन आघाडीत फूट पडण्याची चिन्हे आहेत. नांदेडला ५१ जणांनी ९३ अर्ज नेले. फक्त एका अपक्षाने अर्ज दाखल केला. लातूरला १५ जणांनी ३८ अर्ज दाखल केले. साऱ्या राज्याचे लक्ष असलेल्या बीड मतदारसंघातही पहिल्या दिवशी कोणीही अर्ज दाखल केला नाही.

नांदेडमध्ये काँग्रेस व भाजप उमेदवार आज-उद्याच जाहीर होण्याची शक्यता आहे. उस्मानाबादला काँग्रेसतर्फे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे नाव चर्चेत आल्याने काँग्रेस व राष्टवादीत खलबते चालू आहेत. जालन्याला खोतकरांनी अर्जुनास्त्र मागे घेतल्याने दानवेंची डोकेदुखी कमी झाली असली तरी त्यांच्याविरुद्ध आघाडीतर्फे कोण; हे अजूनही स्पष्ट नाही.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

भाजपच्या पराभवासाठी अनिल गोटेंनी घेतली पवारांची भेट…

यासाठी भारताला वायूदलाच्या ताफ्यातील क्षेपणास्त्रांची संख्या वाढवणे गरजेचे…

काँग्रेसच्या ‘या’ नेत्यांमुळे बाळू धानोरकर यांचा लोकसभेचा पत्ता कट…