नवी दिल्ली । Sensex च्या पहिल्या दहा कंपन्यांपैकी सहा कंपन्यांचे बाजार भांडवल (Market Capitalisation) गेल्या आठवड्यात 69,611.59 कोटी रुपयांनी वाढले. रिलायन्स इंडस्ट्रीजला सर्वाधिक फायदा झाला. पहिल्या दहा कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजशिवाय एचडीएफसी बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कोटक महिंद्रा बँक यांच्या मार्केटकॅप मध्ये वाढ झाली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर लि. आणि बजाज फायनान्सची मार्केट कॅप घटली.
कोणत्या कंपनीला किती फायदा झाला ?
आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केटकॅप 24,470.25 कोटी रुपयांनी वाढून 13,38,763.60 कोटी रुपयांवर पोहोचली. रिलायन्स इंडस्ट्रीजला सर्वाधिक फायदा झाला. आयसीआयसीआय बँकेची मार्केटकॅप 14,966.52 कोटी रुपयांनी वाढून 4,57,268.94 कोटी रुपयांवर पोहोचली. एचडीएफसी बँकेची मार्केटकॅप 10,998.18 कोटी रुपयांनी वाढून 8,41,000.85 कोटी आणि एचडीएफसीची मार्केटकॅप 7,259.12 कोटी रुपयांच्या वाढीसह 4,58,109.66 कोटी रुपये झाली.
त्याचप्रमाणे कोटक महिंद्रा बँकेची मार्केटकॅप 6,027.27 कोटी रुपयांनी वाढून 3,47,027.74 कोटी आणि स्टेट बँक ऑफ इंडियाची मार्केटकॅप 5,890.25 कोटी रुपयांनी वाढून 3,83,936.79 कोटी रुपये झाली.
या ट्रेंडच्या विपरीत, हिंदुस्तान युनिलिव्हरची मार्केटकॅप 8,223.56 कोटी रुपयांनी घसरून 5,67,331.72 कोटी रुपयांवर गेली. टीसीएसची मार्केटकॅप 4,845.75 कोटी रुपयांनी घसरून 11,81,717.45 कोटी रुपयांवर गेली. इन्फोसिसची मार्केटकॅप 3,642.4 कोटी रुपयांनी घसरून 6,62,287.84 कोटी आणि बजाज फायनान्सची मार्केटकॅप 570.4 कोटी रुपयांनी घसरून 3,69,810.18 कोटी रुपयांवर गेली.
RIL चा सर्वाधिक फायदा
पहिल्या दहा कंपन्यांच्या लिस्टमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर अनुक्रमे टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बजाज फायनान्स आणि कोटक महिंद्र बँक यांचा क्रमांक लागतो. गेल्या आठवड्यात BSE चा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 753.87 अंकांनी किंवा 1.43 टक्क्यांनी वधारला.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा