हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि (Maruti Baleno CNG vs Swift CNG) डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्राहकांचा कल हा CNG वाहनांकडे वळला आहे. अनेक कार उत्पादन कंपन्यांनी सुद्धा आपल्या CNG गाड्या बाजारात उतरवल्या आहेत आणि या गाडयांना जोरदार मागणीही आहे. त्यातच प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीने काही दिवसांपूर्वी आपली Baleno आणि Swift या गाड्या CNG व्हेरिएन्ट मध्ये लॉन्च केल्या आहेत. दोन्ही गाड्यांची बाजारात मोठी चलती आहे. परंतु तुम्हाला या दोन्ही पैकी कोणती तरी १ गाडी खरेदी करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला दोन्ही कारची तुलना करून सांगणार आहोत.
साईज –
दोन्ही कारचे आकारमान (Maruti Baleno CNG vs Swift CNG) पाहिले तर मारुती बलेनो CNG ची लांबी 3990mm, रुंदी 1745mm आणि उंची 1500mm आहे. आणि त्याचा व्हीलबेस 2520mm आहे. तर दुसरीकडे, मारुती स्विफ्ट सीएनजीची लांबी 3845 मिमी, रुंदी 1735 मिमी आणि उंची 1530 मिमी आहे. त्याच वेळी, त्याचा व्हीलबेस 2450 मिमी आहे.
फीचर्स –
फीचर्स बाबत सांगायचं झाल्यास , (Maruti Baleno CNG vs Swift CNG) दोन्ही हॅचबॅकमध्ये टर्न इंडिकेटर, बॉडी कलरचे बंपर आणि डोअर हँडल, रियर पार्सल शेल्फ, मल्टी-इन्फो डिस्प्ले, टिल्ट-अॅडजस्टेबल स्टीयरिंग, पॉवर विंडो, इलेक्ट्रिकली फोल्डेबल आणि अॅडजस्टेबल ORVM, पॉवर स्टीयरिंग, सिक्युरिटी अलार्म, बॉडी कलरचे साइड मिरर मिळतात. परंतु स्विफ्ट पेक्षा बलेनो अनेक नवीन वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. बलेनो मध्ये 360-डिग्री कॅमेरा, हेड-अप डिस्प्ले, नवीन 9-इंच डिजिटल टचस्क्रीन, अपडेटेड डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांसारखी अनेक प्रगत वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. तर स्विफ्ट मध्ये बलेनो प्रमाणे इंटीरियर देखील अपडेट केलेले नाहीत आणि ऑटो-एलईडी हेडलाइट्स किंवा रिव्हर्स कॅमेरा सारखी वैशिष्ट्ये मिळत नाहीत.
इंजिन- (Maruti Baleno CNG vs Swift CNG)
गाडीच्या इंजिनबाबत बोलायचं झाल्यास, मारुती सुझुकी बलेनो आणि स्विफ्ट सीएनजी या दोन्ही कार मध्ये एकसारखेच इंजिन आहे. दोन्ही गाड्याना 1.2-लिटर, 4-सिलेंडर, ड्युअलजेट ड्युअल VVT पेट्रोल इंजिन मिळत. हे इंजिन CNG मोडमध्ये 77.5PS ची कमाल पॉवर आणि 98.5Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. दोन्ही हॅचबॅकमध्ये 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळते. मात्र मायलेजचा विचार केला तर बलेनो पेक्षा स्विफ्टला किंचित जास्त मायलेज मिळत. स्विफ्ट CNG 30.90 किमी/किलो मायलेज देते तर दुसरीकडे Baleno CNG चे मायलेज 30.61km/kg आहे.
किंमत –
बलेनो सीएनजी डेल्टा व्हेरियंटची (Maruti Baleno CNG vs Swift CNG) किंमत 8.28 लाख रुपये आहे तर Zeta व्हेरिएंटची किंमत 9.21 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर दुसरीकडे स्विफ्ट CNG मॉडेलच्या किमती ₹ 7.77 ते 8.45 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होतात.
हे पण वाचा :
Maruti Suzuki Alto K10 CNG : मारुतीचा डबल धमाका; Alto K10 CNG मध्ये लॉन्च
Honda Car : Honda च्या या गाड्यांवर 63,000 रुपयांपर्यंत बंपर सूट; तुम्हीही घ्या फायदा
Cheapest Electric Car : सर्वात स्वस्त Electric Car लॉन्च; 2 हजार रुपयांत करा बुक
Maruti Suzuki Baleno Delta CNG : मारुतीची ही CNG कार बाजारात घालणार धुमाकूळ; 31 किमीचे मायलेज