पंढरपूर : हॅलो महाराष्ट्र – भरधाव ट्रकने मारुती स्विफ्ट कारला जोरदार धडक दिल्याने पंढरपूर सांगोला रस्त्यावर मठ वस्तीजवळ एक भीषण अपघात (accident) झाला. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात (accident) एवढा भीषण होता कि, यात कारचा चक्काचूर झाला. सुशांत सुभाष केदार आणि शनिदेव प्रकाश केदार अशी या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. दोघेही सांगोला तालुक्यातील वासूद येथील रहिवासी आहेत.
या दोघांच्या मृत्यूनंतर केदार कुटुंबासह वासूद गावावर मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे. मयत सुशांत आणि शनिदेव हे तरुण आपल्या मारुती स्विफ्ट कारने पंढरपूरकडून सांगोल्याला चालले होते. यावेळी पंढरपूर ते खर्डी दरम्यान मठ वस्तीजवळ कार येताच सांगोल्याकडून पंढरपूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक (accident) दिली आणि यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नवी मुंबईतील पामबीच रोडवर भीषण अपघात
अशीच एक घटना नवी मुंबईतील पामबीच रोडवर कारावे गावाजवळ (accident) घडली आहे. यामध्ये कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. मनोज विश्वकर्मा असे या अपघातात (accident) मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एनआरआय पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी ह्युंडाई वेरना कार चालकाला ताब्यात घेतले आहे.
हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर