Maruti Suzuki Grand Vitara 2022 : मारुती सुझुकीची Grand Vitara लाँच; पहा काय आहे किंमत?

Maruti Suzuki Grand Vitara 2022
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची (Maruti Suzuki Grand Vitara 2022) चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत.त्याच पार्श्वभूमीवर भारतातील प्रसिद्ध कार कंपनी मारुती सुझुकीने आपली ग्रँड विटारा भारतात लॉन्च केली आहे. हि SUV Kia Seltos, Hyundai Creta, MG Aster, Tata Harrier सारख्या गाड्यांना तगडी फाईट देईल . चला आज आपण जाणून घेऊया मारुती ग्रँड विटारा मध्ये काय खास गोष्टी आहेत..

फीचर्स-

मारुती सुजूकीच्या या (Maruti Suzuki Grand Vitara 2022) नवीन ग्रँड व्हिटाराला स्लीक आणि मस्क्युलर डिझाइन मिळाले आहे. समोरची मोठी लोखंडी जाळी आणि चौकोनी चाकांच्या कमानी नवीन मारुती सुझुकी ग्रँड विटाराला आकर्षक लुक देतात. समोर स्प्लिट हेडलॅम्प डिझाइन आहे. मारुती सुझुकीच्या या नव्या Grand Vitara ला LED डेटाइम रनिंग लॅम्प्स, प्लॅस्टिक बॉडी क्लेडिंग, 17-इंच चाके आणि बरेच काही असलेले प्रोजेक्टर हेडलॅम्प्स मिळतात. मागील बाजूस, स्लीक एलईडी टेल लॅम्प आहेत.

Maruti Suzuki Grand Vitara 2022

सहा मोनोटोन कलर आणि 3 ड्यूलटोन कलर ऑप्शन-

मारुती सुझुकी ग्रँड विटारा (Maruti Suzuki Grand Vitara 2022) सहा मोनोटोन कलर ऑप्शन आणि 3 ड्यूलटोन कलर ऑप्शनसह लॉन्च केली आहे. सुरक्षिततेसाठी, या SUV ला 6 एअरबॅग ESP, हिल होल्ड असिस्ट, रिअर डिस्क ब्रेक, हिल डिसेंट कंट्रोल आणि TPMS या सिविधा उपलब्ध आहेत .

 

इंजिन– (Maruti Suzuki Grand Vitara 2022)

गाडीच्या इंजिन (Maruti Suzuki Grand Vitara 2022) बाबत बोलायचं झालं तर, मारुती सुझुकी विटारा हायब्रिड दोन पॉवरट्रेन पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. 1.5-लिटर हायब्रिड पेट्रोल इंजिन आणि 1.5-लीटर ड्युअल VVT पेट्रोल इंजिन. ही SUV EV, Eco, Power आणि Normal. अशा 4 ड्राइव्ह मोडमध्ये उपलब्ध आहे. ईव्ही मोडमध्ये, कार पूर्णपणे इलेक्ट्रिक मोटरद्वारे चालविली जाते. विशेष म्हणजे ही SUV एका लिटरमध्ये 27.97 किमीचा प्रवास करते.

Maruti Suzuki Grand Vitara 2022

SUV ची किंमत-

मारुती सुझुकी ग्रँड विटाराची एक्स-शोरूम किंमत 9.50 लाख रुपयांच्या आसपास असू शकते. कंपनीने 11,000 रुपयांच्या टोकन रकमेसह गाडीचे बुकिंग सुरू केले आहे.

हे पण वाचा : 

TVS Ronin 225 : बुलेटला टक्कर देणार TVS ची Ronin 225; पहा वैशिष्ट्ये आणि किंमत

Bajaj Pulsar N160 : बजाजची Pulsar N160 नुकतीच लॉंच; पहा किंमत आणि फीचर्स

Citroen C3 Launch : दमदार फीचर्ससह Citroen C3ची भारतात धमाकेदार एन्ट्री; पहा काय आहे किंमत

BMW G310 RR : BMWने लाँच केली दमदार बाईक; पहा किंमत आणि फीचर्स

Hyundai Tucson 2022 : ह्युंदाईची नवी Tucson बाजारात लॉन्च; पहा फीचर्स आणि किंमत