मुंबई । भारतात कार तयार करणाऱ्या कंपनींपैकी एक आघाडीची मारुती- सुझुकी कंपनीने तब्बल १.३४ लाखांहून जास्त कार माघारी मागवल्या आहेत. कंपनीने ‘रिकॉल’ केलेल्या सर्व वॅगनआर आणि बलेनो कार आहेत. या गाड्यांच्या फ्युअल पंपमध्ये (fuel pump) दोष असल्यामुळे कार माघारी मागवल्या आहेत.
मारुती-सुझुकीकडून एक लिटर पेट्रोल इंजिन Wagon R च्या ५६ हजार ६६३ कार परत मागवण्यात आल्या आहेत. या वॅगन आर कार १५ नोव्हेंबर २०१८ ते १५ ऑक्टोबर २०१९ दरम्यान मॅन्युफॅक्चर झाल्या आहेत. तर ७८ हजार २२२ बॅलेनो कार माघारी घेतल्या आहेत. या बॅलेनो कार ८ जानेवारी २०१९ ते ४ नोव्हेंबर २०१९ दरम्यान मॅन्युफॅक्चर झाल्या आहेत.
या गाड्यांच्या फ्युअल पंपमध्ये (fuel pump) दोष असल्यामुळे गाड्या माघारी घेण्यात आल्या आहेत. यासाठी कंपनीने डिलर्सना ग्राहकांशी संपर्क करण्यास सांगितले आहे. फ्युअल पंपमध्ये दोष असल्यास तो दूर करुन ग्राहकांना त्यांच्या कार परत केल्या जाणार आहेत. यासाठी ग्राहकांकाडून पैसे आकारले जाणार नाहीत, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.