मेढा नगरपंचायतच्या ‘त्या’ नोटीसाला व्यापाऱ्यांनी दाखवली केराची टोपली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनीधी । जिल्ह्यातील जावली तालुक्यातील निझरे गावमध्ये कोरोनाचे ३ पाॅझीटीव्ह रुग्ण आढळले आहेत. मुंबईवरून आलेल्या या रुग्णांच्या संपर्कात आल्याने सतर्कतेची गरज वाढली आहे. या पार्श्वभुमीवर मेढा नगरपंचायतने मेढा नगरपंचायतच्या हद्दीतील सर्व किराणा व भाजीपाला विकणार्या व्यापाऱ्यांनी वैद्यकीय तपासणी करुन घेण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. मात्र दोन ते तीन व्यापाऱ्यांनी वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र नगरपंचायतला दिले असल्याची माहिती समोर आली आहे. मेढा नगरपंचायतच्या वैद्यकीय तपासणी नोटीसाला व्यापाऱ्यांनी दाखवलेल्या केराची टोपलीमुळे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे.

कोव्हीड १९ जागतिक माहमारीच्या विरोधात लढताना प्रशासन प्रयत्नाची पराकाष्टा करत आहे. मेढा नगरपंचायतने मेढा शहरातील फळवाले, किराणावाले, मेडीकलवाले, दुधवाले, दुकानमालक व कामगारांची वैद्यकीय तपासणी करण्याची नोटीस बजावली. सदरची वैद्यकीय तपाषाणी पुर्ण झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारची विक्री करु नये. तपासणी न करता विक्री केल्यास त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास आपणांस जवाबदार धरण्यात येईल व कारवाई करण्यात येईल असे व्यापाऱ्यांना दिलेल्या नोटीसामध्ये म्हटले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे फक्त दोन ते तीन व्यापाऱ्यांनी मेढा नगरपंचायतकडे आरोग्य तपासणी प्रमाणपत्र सादर केले. मेढा नगरपंचायतच्या हद्दीमधील येणाऱ्या बरेच फळ विक्रते, किराणामाल, मेडीकलवाले, दुधवाले यांनी याकडे कानाडोळा केला आहे. कोरोनाचे संसर्ग राज्यात वाढत असताना व्यापारी व इतर विक्रेते यांचा हा बेजबाबदारपणाचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळं प्रशासनाच्या नोटीसांना प्रतिसाद न देता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्यांविरोधात आता काय कारवाई केली जाणार याबाबत मेढ्यात सध्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

Leave a Comment