माझा मुलगाही असल्या खोटारड्या वाघांबरोबर नेहमी खेळत असतो; मेहबूब शेख यांचा चित्रा वाघ यांच्यावर पलटवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ  यांच्यातील शाब्दिक युद्ध विकोपाला गेले आहे. याच दरम्यान मी वाघ असून कोल्ह्या कुत्र्यांना घाबरत नाही अशी जळजळीत टीका चित्रा वाघ यांनी केल्यानंतर आता मेहबुब शेख यांनी देखील पुन्हा एकदा चित्रा वाघ यांच्यावर पलटवार केला आहे.

मेहबूब शेख यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. त्यामध्ये आपल्या लहान मुलाचा खेळण्यातल्या वाघासोबतचा फोटो शेअर करत माझा मुलगा पण असल्या खोटारड्या वाघांबरोबर नेहमी खेळत असतो असा जोरदार टोला लगावला.

https://www.facebook.com/mahebubshaikh99/posts/4358766194209970

दरम्यान , यापूर्वी चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांना सडेतोड उत्तर दिली होते. वाघावर कोल्हे, कुत्रे भुंकताहेत .कारण मी पिडीतांच्या पाठीशी उभी रहाते म्हणून. पण मी काय आहे आणि काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या. असा दम भरवत मी वाघ आहे लक्षात ठेवा, कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही. असा इशारा त्यांनी दिला होता

Leave a Comment