Mercedes Electric Car : मर्सिडीजने लॉन्च केली इलेक्ट्रिक कार; एका चार्जिंगमध्ये 580 किमी धावणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारात इलेक्ट्रिक (Mercedes Electric Car) वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर जर्मन लक्झरी कार कंपनी मर्सिडीज-बेंझने आज आपली नवीन इलेक्ट्रिक सेडान कार लॉन्च केली आहे. मर्सिडीज-बेंझ EQS AMG 53 4Matic+ असं या नव्या सेडान कारचे नाव असून एकदा चार्ज केल्यानंतर ही कार तब्बल ५८० किमी धावू शकते असा दावा कंपनीने केला आहे. आज आपल्या कार रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या लक्झरी कारची वैशिष्टये आणि किंमत…

वैशिष्ट्ये-

मर्सिडीजच्या या अत्याधुनिक (Mercedes Electric Car) कारमध्ये डीआरएलसोबत एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एलईडी लाइटिंग देण्यात आली आहे. तसेच इलेक्ट्रिक कार असल्याने तिच्या ग्रिलला स्पोर्टी डिझाइन देण्यात आले आहे. याशिवाय कारच्या पाठीमागील बाजूस उत्कृष्ट असे लायटिंग आहे. या इलेक्ट्रिक सेडान मध्ये LED रीअर लाइट्स, अॅक्टिव्ह अॅम्बियंट लाइटिंग, 22 अलॉय व्हील्स, LED ल्युमिनेसेंट बँड फ्रंट आणि रिअर, फ्रंट कॅमेरा, MBUX, ब्लॅक पॅनल फ्रंट ग्रिल सारखी फीचर्स आहेत.

Mercedes Electric Car

एका चार्जिंगमध्ये 580 किमी धावणार-

मर्सिडीजची ही इलेक्ट्रिक सेडान (Mercedes Electric Car) ही भारतातील पहिली कार आहे ज्यामध्ये 56-इंचाची MBUX हायपरस्क्रीन देण्यात आले आहे. हे हायपरस्क्रीन गोरिल्ला ग्लासच्या आत तीन स्वतंत्र OLED डिस्प्लेसह एकत्रित केले आहे. या लक्झरी इलेक्ट्रिक सेडान कारमध्ये 107.8kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही कार केवळ 3.4 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग घेऊ शकते आणि तिचा वेग 250 किमी प्रतितास इतका आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही कार तब्बल 580 किमी धावू शकते असा दावा कंपनीने केला आहे.

किंमत- (Mercedes Electric Car)

मर्सिडीजच्या या इलेक्ट्रिक सेडान कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 2.45 कोटी रुपये आहे. या गाडीवर ग्राहकांना 2 वर्षे / 30,000 किमीची सर्व्हिस वॉरंटी आणि 10 वर्षे / 2,50,000 किमीची बॅटरी वॉरंटी मिळेल.

हे पण वाचा :

iVOOMi JeetX Electric Scooter : Ola ला टक्कर देणार ही दमदार स्कुटर; 200 किमीचे मायलेज

Maruti Suzuki Alto K10 : नवी Alto K10 बाजारात घालणार धुमाकूळ; पहा किंमत आणि फीचर्स

Mahindra Electric Cars : महिंद्राचा मोठा धमाका!! लवकरच लॉंच करणार 5 इलेक्ट्रिक SUV

Hyundai Tucson 2022 : Hyundai Tucson मध्ये काय आहे खास; पहा या आलिशान SUV च्या विविध प्रकारांच्या किमती

Citroen C3 Launch : दमदार फीचर्ससह Citroen C3ची भारतात धमाकेदार एन्ट्री; पहा काय आहे किंमत