एसटीचे विलीनीकरण करा, नसेल तर इच्छा मरणाची परवानगी द्या

st bus
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी सांगली मध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन कायम आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आज आपल्या कुटुंबियां समवेत तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढत एसटी कर्मचारयांना कुटुंबासमवेत इछा मरणाची परवानगी द्या,अशी मागणी कार्य करत स्वतःहून आत्महत्या करू,असा इशारा दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे,या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.

सांगलीत एसटी कर्मचारी अध्यात आंदोलनाचा आहेत. अद्यापि अनेक कर्मचारी सेवेत परतले नाहीत. त्यामुळे एसटी महामंडळाकडून निलंबनाची कारवाई देखील करण्यात आलेली आहे. मात्र एसटी कर्मचारी अद्यापही एस्टी विलानीकरन मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे सांगलीतील एसटी कर्मचाऱ्यांचा दुखवटा आंदोलन गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे.

आज सांगली तहसील कार्यालयावर कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत धडक मोर्चा काढला.भाजपाच्या नेतृत्वाखाली सांगली शहरातल्या एसटी बस स्थानकापासून शहरातल्या अप्पर तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा निघाला. ज्यामध्ये शेकडो कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय समवेत सहभागी झाले होते.

यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाने तातडीने एसटीचे विलीनीकरण करावे, नसेल तर एसटी कर्मचाऱ्यांना कुटुंबीयांसह इच्छा मरणाची परवानगी द्यावी,नाही तर आम्ही स्वतःहून आमच्या कुटुंबासमवेत आत्महत्या करू,असा इशारा राज्य सरकारला दिला आहे.