हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाड येथील तळीये गावात पावसामुळे दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. तब्बल 40 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेल्या या गावाचे पुनर्वसन म्हाडा करणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावची परिस्थिती पाहिल्यानंतर गावकर्यांना पुनर्वसनाचा शब्दही दिला होता. त्यानंतर दुर्घटनेमुळे बाधित झालेलं तळीये हे गाव पूर्ण वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय.
कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्विकारली आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला कि कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती.असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं
कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्विकारली आहे.
मा. मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला कि कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती. pic.twitter.com/vdtJLl33gF
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 24, 2021
दरम्यान , मुख्यमंत्र्यांनी आज संपुर्ण महाड क्षेत्राचा दौरा करत दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी मदतीचे आश्वासन दिले होते. काळजी करू नका. सर्वाना मदत करण्यात येईल, कागदपत्रांची चिंता करू नका. ज्याचे ज्याचे नुकसान झालं आहे त्यांना नुकसान भरपाई मिळेल तसेच सर्वांचे पुनर्वसन होईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती