हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी जगातील बहुतेक देशांमध्ये लॉकडाउन जाहीर केले गेले आहे. काही ठिकाणी लॉकडाउनबाबत सरकारचे नियम कठोर आहे तर काही ठिकाणी असून नसल्यासारखे आहेत. परंतु लॉकडाऊनबाबत तुर्की या देशाने वेगवेगळे नियम बनवले आहेत. कोरोनाव्हायरसचा सामना करण्यासाठी वेगळ्या मार्गावर असलेल्या तुर्कीने विकेंडला लॉकडाउन लादले,तर एका आठवड्याच्य इतर दिवसांमध्ये फक्त मुले आणि वयोवृद्ध लोकांना घराबाहेर येण्यास मनाई केली आहे.अशा परिस्थितीत, शनिवार व रविवारच्या लॉकडाऊन व वय-विशिष्ट निर्बंधांद्वारे तुर्कीने कोरोनाशी लढायचा एक नवीन प्रयोग केला आहे.
सीएनएनच्या अहवालानुसार, तुर्कीमध्ये मागील शनिवार व रविवार लॉकडाऊन होता.३१ प्रांतांमध्ये ४८ तासांचा कर्फ्यू लागू करण्यात आला. तुर्की सरकारने दोन तासाच्या अगोदर सूचना देऊन कर्फ्यू जाहीर केला होता, ज्यामुळे तुर्कीमध्ये खळबळ उडाली होती.त्यावेळी लोकांनी महत्त्वाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानांवर गर्दी केली. काही ठिकाणी लोकानी थोड्या प्रमाणात सोशल डिस्टंसिंगची काळजी घेतली.
कर्फ्यूमुळे झालेल्या गोंधळामुळे, तुर्कीचे अध्यक्ष तैयब आर्देगेन यांनी लोकांना घरामध्येच राहण्याचे आवाहन केले आणि आश्वासन दिले की तुर्की सरकार कोरोनाविरूद्धच्या युद्धात आपल्या लोकांचे संरक्षण आणि मदत करण्यास सक्षम आहे. यासह, राष्ट्रपतींनी पुढील आठवड्यातही लॉकडाऊन घेण्याची घोषणा केली आहे.तुर्की कोरोनाव्हायरसवर कडक निर्बंध वापरत नाहीये. लोकांना स्टे-होम आणि सोशल डिस्टंसिंगचे अनुसरण करण्याचे आवाहन सरकार करत आहे. त्याच वेळी, स्टे-होम पॉलिसीअंतर्गत केवळ २० वर्षांपेक्षा कमी वयाच्या६० वर्षांवरील लोकांना बाहेर जाण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
बरेच तज्ञ तुर्कीचे ‘लॉकडाउन मॉडेल’ आणि वय-विशिष्ट निर्बंध हे योग्य मानतात. त्यांचे म्हणणे आहे की अशा प्रकारचे लोक, ज्यांना संसर्गाची लागण होण्याची शक्यता अधिक असते, ते घरातच राहतील आणि इतर लोक आवश्यक सुरक्षा उपाययोजना करून त्यांच्या कामासाठी घराबाहेर पडू शकतात.तुर्कीचे आरोग्यमंत्री फहारेटीन कोका यांनी म्हटले आहे की तुर्कीमध्ये कोरोना संसर्गाचे मृत्यूचे प्रमाण हे २ टक्क्यांपेक्षा किंचित जास्त आहे आणि ते तुर्कीच्या आरोग्य सेवा आणि इतर देशांपेक्षा वेगळ्या उपचारांच्या पद्धतीमुळे आहे. तुर्कीमध्ये, जपानी अँटीव्हायरल औषधाच्या मिश्रणासह कोविड -१९ रूग्णाच्या उपचारासाठी हायड्रॉक्सी क्लोरोक्विन दिले जात आहे ज्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत.
पृथ्वीवर आणखीन एक मोठे संकट, ओझोन थराला पडलेय मोठे छिद्र#HelloMaharashtrahttps://t.co/yT96JZZylX
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 10, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”
इतर महत्वाच्या बातम्या –
या देशांमध्ये अद्याप एकही कोरोनाग्रस्त नाही, घ्या जाणुन
आता ८ एवजी १२ तासांची होणार कामाची शिफ्ट? कायद्यात होणार सुधारणा
मासे किंवा अन्य सीफूड खात असाल तर सावधान! UN ची चेतावणी
भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना दिलासा, सीएम ठाकरेंनी घेतला ‘हा’ खास निर्णय
सरकार हॅलिकोप्टरमधून टाकणार लोकांसाठी पैसे? जाणुन घ्या सत्य
ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा -www.hellomaharashtra.in