महाराष्ट्रातून इंदौरकडे निघालेल्या कामगार पती पत्नीला टँकरने उडवले; ४ जण ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । महाराष्ट्रातून इंदौरच्या दिशेने पायी प्रवास करणाऱ्या कामगार पती पत्नीला आज सकाळी एका टँकरने उडवल्याची घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील बारवानी येथे हा अपघात झाला असून यात स्थलांतरी कामगार आणि त्याची पत्नी व अन्य दोघे असे एकूण चार जण जागीच ठार झाले आहेत.

देशात कोरोना महामारीमुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. कोरोनामुळे अनेक उद्योग धंदे बंद असून तळहातावर पोट असणाऱ्या कामगार वर्गावर यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. शहरात हाताला काम नसल्याने आणि पोटाला घायला काही मिळत नसल्याने जगायचे कसे असा यक्ष प्रश्न या कामगाराने समोर उभा आहे. यामुळे स्थलांतरित कामगारांनी जमेल त्या मार्गाने आपल्या गावी परतण्याचा सपाट लावला आहे. मात्र यात अनेकांना प्राणाला मुकावे लागत आहे.

दरम्यान, देशात स्थलांतरित कामगारांचे अपघात सत्र सुरूच असून अनेक मजूरांचा आत्तापर्यंत यात मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणू देशातील श्रीमंत लोक विमानाने घेऊन आले आणि त्याच कोरोनाने देशातील गरिबांना हजारो किलोमीटर पायी चालत गावी जायला भाग पाडले असेच काहीसे चित्र सद्यस्थितीत पाहायला मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment