कोलकाता । गृहमंत्री अमित शहांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून, स्थलांतरीत मुजरांना आपल्या घरी पोहचण्यासाठी राज्य सरकारकडून सहकार्य प्राप्त होत नसल्याची तक्रार केली होती, यावर तृणमूल काँग्रेसकडून जोरदार प्रत्यूत्तर देण्यात आलं. अमित शहांनी केलेले खोटे आरोप सिद्ध करावेत अन्यथा माफी मागावी, असा तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांचा पलटवार केला आहे.
तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी अमित शहा यांच्या पत्रावर प्रतिकिया देताना म्हणाले कि , ‘या संकटकाळात आपलं कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरणारे केंद्रीय गृह मंत्री कित्येक आठवड्यांनंतर गप्प राहून आता बोलत आहेत… खोट्या वक्तव्यांसहीत लोकांची दिशाभूल करत आहेत. विडंबना म्हणजे याच सरकारनं लोकांना वाऱ्यावर सोडून दिलंय. शहांनी आपले खोटे आरोप सिद्ध करावेत किंवा माफी मागावी’ असं ट्विट केलं आहे.
A HM failing to discharge his duties during this crisis speaks after weeks of silence, only to mislead people with bundle of lies! Ironically he’s talking about the very ppl who’ve been literally left to fate by his own Govt. Mr @AmitShah, prove your fake allegations or apologise https://t.co/HeWYWFafZ5
— Abhishek Banerjee (@abhishekaitc) May 9, 2020
काय म्हणाले होते पत्रात अमित शहा दीदींना
गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लिहलेल्या पत्रात स्थलांतरी मजुरांना त्यांच्या घरी परतण्यासाठी राज्य सरकारकडून सहकार्य मिळत नसल्याची तक्रार केली होती. ‘प्रवासी मजुरांसोबत पश्चिम बंगाल पोहचणाऱ्या रेल्वेला राज्य सरकारकडून परवानगी नाकारण्यात येतेय. या मजुरांना आपल्या राज्यात परतू न देणं हा अन्याय आहे. यामुळे त्यांना भविष्यात त्रास होऊ शकतो’ असं अमित शहा यांनी म्हटलं होतं.प्रवासी मजुरांच्या प्रश्वावर ममता बॅनर्जी गप्प का आहेत? त्यांनी मजुरांसाठी योग्य ती पावलं उचलावीत, पश्चिम बंगालमध्ये प्रवासी मजूर अधिक चिंतेत आहेत, असंही त्यांनी म्हटलं होतं. आत्तापर्यंत २ लाखांहून अधिक मजुरांना त्यांच्या घरी पोहचवण्यात आलं आहे. इतर राज्यांप्रमाणेच पश्चिम बंगालचे प्रवासी मजुरही आपल्या राज्यात जाण्यासाठी व्याकूळ आहेत. त्यांची जाण्याची व्यवस्थाही केंद्रानं केलीय. परंतु, मला दु:ख आहे की पश्चिम बंगाल सरकारकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही, असंही अमित शहा यांनी म्हटलं पत्रात आहे.
”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”