कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना २४ तासांच्या आत रुग्णालयातून सुट्टी मिळणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसची कोरोना व्हायरसची (COVID19) कोणतीही लक्षणे नसलेल्या (asymptomatic) आणि सौम्य लक्षणे (mild symptom) असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही, असे नुकतेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील आरोग्य यंत्रणेने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, कोरोनाची लक्षणे नसलेल्या आणि अतिसौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना २४ तासांच्या आत रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल. दिल्लीच्या आरोग्य यंत्रणेने शनिवारी यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक जारी केले.

मात्र, दुसरीकडे मागील २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल १० हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून याच गतीने नव्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २,३६,६५७ इतका झाला आहे. देश अनलॉक होण्याच्या दिशेनं जात असताना कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या आरोग्य यंत्रणेवरील ताण आणि चिंता वाढवत आहेत.

अशा वेळी, सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना सुट्टी देण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार दिल्लीतील आरोग्य यंत्रणेने अशा रुग्णांना घरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आता देशातील इतर राज्यांकडूनही दिल्लीचा कित्ता गिरवला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment