लॉटरी लागल्याच्या बहाण्याने युवतीकडून उकळले लाखो रुपये ; अज्ञातांविरोधात पोलीस तक्रार दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड : लॉटरी लागल्याची बतावणी करून बँक खात्यात वेळोवेळी सुमारे दीड लाख रुपये भरायला लाऊन युवतीची फसवणूक करण्यात आली. याबाबत फसवणूक झालेल्या युवतीने कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्षा शिवाजी भोसले (रा. ओंड, ता. कºहाड) यांनी याबाबतची फिर्याद कºहाड ग्रामीण पोलिसात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंड येथील वर्षा भोसले यांची बहिण सिमा यांनी दोन वर्षांपुर्वी एक मशिन खरेदी केली होती. त्यावेळी त्यांना मशिनसोबत एक कुपन मिळाले होते. वर्षा यांनी २१ जानेवारी २०२१ रोजी ते कुपन भरून संबंधित कंपनीने दिलेल्या व्हॉटस्अ‍ॅप क्रमांकावर पाठवले. त्यानंतर वर्षा यांच्या मोबाईलवर एक फोन आला.

तुम्ही पाठविलेले कुपन आम्ही व्हेरीफाय केले असून तुम्हाला साडेआठ लाखाची लॉटरी लागली असून ते पैसे मिळण्यासाठी तुम्हाला कंपनीकडून सांगीतलेली कार्यवाही करावी लागेल, असे सांगण्यात आले. त्यानुसार वर्षा यांनी त्यांच्या अकाऊंटवरून संबंधित व्यक्तीने सांगीतलेल्या व्यक्तीच्या बँक खात्यावर पैसे पाठवले.

काही दिवसांनी संबंधित कंपनीतून मॅनेजर वैभव कपूर बोलत असल्याचे सांगून त्या व्यक्तीनेही वर्षा यांना वेळोवेळी आणखी पैसे पाठविण्यास सांगीतले. वर्षा यांनी संबंधितांच्या बँक खात्यावर १ लाख ३६ हजार ६०० रुपये टाकले. मात्र, आणखी पैशाची मागणी होऊ लागल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे वर्षा यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी याबाबत कºहाड ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञातांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment