औरंगाबाद – महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दहशतवाद यांच्या नातेवाईकांकडून जमीन खरेदी केली म्हणून अटक केली. आम्ही पूर्णपणे मलिक यांच्या पाठीशी आहोत. यांच्या समर्थनार्थ महा विकास आघाडीचे तीन पक्ष एकत्र येऊन पाठिंबा दर्शवत होते. त्यापेक्षा जास्त संख्येने आम्ही क्रांती चौकात येऊन पाठिंबा दर्शवून शकतो, असे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
अजित पवार यांनी या पेक्षा मोठे घोटाळे केले आहेत. त्यांना आज पर्यंत केंद्राच्या ईडिने का अटक केलेली नाही. शरद पवार यांना फक्त नोटीस बजावली होती. तेव्हा संपूर्ण नेते ईडी कार्यालयासमोर आले होते. आजम खान, छगन भुजबळ यांना अटक केली होती. तेव्हा कोणी विरोध दर्शवला नाही. भाजप ज्या पद्धतीने वागत आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. मलिक यांनी जमीन कधी खरेदी केली आत्ताच त्यांना अटक करण्यामागे काय कारण आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाविकासआघाडी मधील तिने पक्षांचे नेते कार्यकर्ते एकत्र आले. हा निव्वळ देखावा आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांचे मलिक यांच्या मुलीला भेटणे हा राजकीय नाट्याचा भाग होता, असा आरोप जली यांनी केला. एमआयएम मलिक यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर कधी उतरणार, याची तारीख मात्र त्यांनी जाहीर केली नाही, हे विशेष.