हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एमआयएमकडून नेहमी मोदी सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी काश्मीरमध्ये बाहेरील लोकांच्या हत्या आणि चीनकडून घुसखोरीच्या घटनांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. “मोदी सध्या दोन गोष्टींबद्दल तोंड उघडत नाही. एक म्हणजे पेट्रोल आणि डिझेलची महागाई आणि दुसरी चीनची घुसखोरी. नऊ सैनिकांचा मृत्यू झाल्यानंतर तुम्ही टी २० खेळणार आहात? आज पाकिस्तान काश्मीरमध्ये भारतीयांच्या जीवाशी टी २० खेळत आहे, पण तुम्ही काय करत आहात?, असा सवाल ओवेसी यांनी विचारला आहे.
एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भारताच्या सीमेवर चिनी घुसखोरी आणि जम्मू -काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. एका कार्यक्रमप्रसंगी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनवर बोलण्यास नेहमीच घाबरतात. चहामध्ये साखरही टाकत नाही जेणेकरून चीनचा उल्लेख होऊ येऊ नये. जेव्हा पाकिस्तानने पुलवामा हल्ला केला, तेव्हा मोदी म्हणाले की आम्ही घरात घुसून मारू, मग आम्ही मारा असे सांगितले. आता चीन डोकलाम, डेपसांगमध्ये बसला आहे आणि भारताचे पंतप्रधान काहीच करत नाहीत. त्यांना चीनबद्दल बोलायला भीती वाटते.
आम्हाला भारताच्या पंतप्रधानांना विचारायचे आहे की सैन्याचे नऊ सैनिक मारले गेले आहेत आणि २४ तारखेला भारत आणि पाकिस्तानचे टी २० आयोजित करण्याची तयारी करण्यात येत आहे. पाकिस्तानकडून दहशतवादी, हत्यारे येत आहेत. दहशतवादाला सामोरे जाण्यासाठी मोदी सरकारकडे कोणतेही धोरण नाही, अशी टीका ओवेसी यांनी केली आहे.