फुलंब्रीमध्ये मुस्लिम मतांचं सेटिंग, काँग्रेसला मदत केल्याचा इम्तियाज जलीलांवर गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । फुलंब्री मतदारसंघात एमआयएमकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या दिलावर बेग यांनी इम्तियाज जलील यांच्यावर फसवणुकीचा गंभीर आरोप केला आहे. तिकीट देण्याच्या प्रक्रियेसाठी आपल्याला खेळवत ठेवण्यात आल्याचं बेग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. एमआयएमचा विरोधक असणाऱ्या काँग्रेस पक्षातील उमेदवाराच्या भावाशी संगनमत करून आपल्याला तिकीट नाकारण्यात आल्याचं दिलावर बेग म्हणाले.

जगन्नाथ काळे या काँग्रेसच्या व्यक्तीवर बेग यांनी हे आरोप केले असून यामध्ये काही आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप बेग यांनी केला. आपण केलेल्या आरोपानंतर एमआयएमने एका उमेदवारास तिकीट दिले असून आपणही अपक्ष म्हणून अर्ज भरला असल्याचं बेग पुढे म्हणाले. आम्हाला तिकीट द्यायचच नव्हतं तर जलील यांनी आमच्याकडून ५ हजार रुपये कशाला भरून घेतले याचं उत्तर द्यावं असं म्हणत, आपला पक्ष औरंगाबादमध्ये वाढवायचा नाही का असा संतप्त सवालही बेग यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे असदुद्दीन ओवेसी यांना विचारलं आहे.

विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांचा हा मतदारसंघ असून काँग्रेसतर्फे पूर्ण तयारीनिशी निवडणूक लढविण्यासाठी आणि मुस्लिम मतांचं विभाजन रोखण्यासाठी ही पद्धत अवलंबिली गेल्याची एकूण चर्चा आहे.

इतर महत्वाच्या बातम्या –