आम्हाला नुसती इफ्तारची दावत, तोंडात खजूर? आम्ही काय भिकारी आहोत का?”;ओवेसींचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत लोकसभा व राज्य सभेचे संसदीय अधिवेशन पार पडले. यावेळी एमआयएमचे अध्यक्ष, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिम आरक्षणावरुन ठाकरे व मोदी सरकारवर हल्लाबोल केला. “तुम्ही मते मिळवाल, मुख्यमंत्री बनवणार, पंतप्रधान बनवणार आणि आम्हाला काय मिळणार नुसती इफ्तारची दावत आणि तोंडात खजूर? आरक्षण मात्र, नाही? “आम्ही काय भिकारी आहोत का? असा सवाल सभागृहात उपस्थित करीत संताप व्यक्त केला.

अधिवेशनावेळी पार पडलेल्या चर्चेत मराठा समाजाच्या आरक्षणाबरोबर इतर समाजाच्या आरक्षणाकडेही लक्ष देण्याची मागणी हि महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी केली. यावेळी मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर एमआयएमचे अध्यक्ष, खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, ”शिवसेना, राष्ट्रवादीतील खासदार म्हणत आहेत कि, मराठा आरक्षणाचा विचार करा. मात्र, मेहमूद रेहमान कमिटीच्या रिपोर्टने सांगितले होते कि महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम सामाजिकदृष्ट्या शैक्षणिक मागास आहे. मात्र, राज्यातील खासदार हे फक्त मराठा समाजाबाबतच बोलण्याचे काम करीत आहेत. मुस्लिमांबाबत का नाही बोल्ट. आमच्याही समाजाचा आरक्षणासाठी विचार केला जावा, अशी मागणी यावेळी खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली.

आज पार पडलेल्या राज्य सभेच्या अधिवेशनात खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सर्व सभागृहाती खासदारांचे मुस्लिम समाजाच्या मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी ठाकरे सरकार व मोदी सरकारवरही जोरदार टीका केली. यावेळी खासदारओविसी म्हणाले की, “आजही महाराष्ट्र राज्यात मुस्लिमांच्या त्या ५० जाती मागास आहेत ते तुमचा तमाशा पाहत आहेत. त्यांचा विचार जर नाही केला तर त्या तुम्हाला उघडे पडल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही यावेळी खासदार ओविसी यांनी दिला आहे.

Leave a Comment