“आली आता खरी वेळ आली…”; ओवेसींचा मोदी सरकारला इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांचा विरोध असताना देखील तीन कृषी कायदे तयार केले आहेत. या कायद्याविरोधात शेतकऱ्यांकडून आता आंदोलने केली जात आहेत. या शेतकरी आंदोलनादरम्यान उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ातील टिकोनिया येथे काल हिंसाचाराची घटना घडली. यावरून एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारला इशारा दिला आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ातील टिकोनिया येथे काल घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेबाबत एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने हत्या केलेल्यांच्या प्रति एकजुट दर्शवण्यासाठी मी उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे जाणार आहे. आता वेळ आली आहे की, मोदी सरकारने तीन कृषी कायदे मागे घ्यावेत आणि त्यांनी या मंत्र्यास देखील हटवावे, असा इशारा ओवेसी यांनी दिला आहे.

लखीमपूर या ठिकाणी घडलेल्या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. शिवाय, वाहने पेटवल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले आहे. यावरून आता विविध पक्षातील नेत्यांकडून भाजपवर टीकास्त्र डागले जात आहे. या घटनांमुळे योगी सरकार व मोदी सरकार निशाणाही साधला जात आहे.

Leave a Comment