औरंगाबादचं नाव Google Map वर संभाजीनगर; MIM उचलणार ‘हे’ पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकारने औरंगाबाद चे नामकरण छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर एमआयएमने या नामांतराला जोरदार विरोध केला होता. त्यातच आता गुगल मॅप वर सुद्धा औरंगाबादच्या ऐवजी संभाजीनगर असे दाखवण्यात आल्यामुळे एमआयएम आक्रमक झाले आहे. याच पार्श्वभूमीवर थेट गुगल मॅप विरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

सामाजिक भावना दुखावणे, बेकायदेशीर कृत्य करणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे या कलमानुसार तक्रार दाखल करणार असल्याची माहिती एमआयएमच्या वतीने देण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासोबतच न्यायालय आणि केंद्रीय यंत्रणांकडे देखील तक्रार नोंदवणार असल्याचे एमआयमएमने म्हटले आहे

दरम्यान, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनीही याबाबत गुगल मॅप ला जाब विचारला आहे. तुमच्या नकाशात माझ्या औरंगाबाद शहराचे नाव कशाच्या आधारावर बदलले आहे ते स्पष्ट करू शकता का असा सवाल जलील यांनी गुगल मॅपला केला आहे. ज्या कोट्यवधी नागरिकांसोबत हा दुष्प्रचार खेळला गेला आहे, त्यांना तुम्ही स्पष्टीकरण द्यावे असे म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Comment