हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेत घोषणा केली. वादग्रस्त असलेले तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली. याबाबत मदत व पुनर्वसनमंत्री विजय वड्डेट्टीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मोदींनी कायद्याचा निर्णय मागे घेतला. तो स्वतःहून घेतलेला नाही. अगोदरच निर्णय घेतला असता तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या असत्या. शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहाशे शेतकरी मृत्युमुखी पडले. त्यांच्या मृत्यूस जबाबदार कोण आहे? त्याचीही जबाबदारी मोदींनी घ्यावी, अशी टीका वड्डटीवार यांनी केली.
विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शेतकरी संघटनांनी केलेल्या आंदोलनामुळे आज त्याचा विजय झाला आहे. मात्र, दुसरीकडे विचार करायचा झाला तर फेर निवडणुकीत भाजपला फटका बसला. मोदींनी आज जो निर्णय घेतला. तो निर्णय घ्यायला इतका उशिर का केला? 600 शेतकऱ्यांचा बळी का घेतला? हेच जर पूर्वी केले असते तर शेतकऱ्यांमधील उद्रेक थांबला असता. ग्रामीण भागातील जनता पेटली आहे. या कायद्यां विरोधात जी भुमिका या आंदोलनकर्त्यांनी मांडली, आंदोलने केली. यांना सत्तेतील कोणताही नेता भेटायला जाऊ शकला नाही”, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
आज जो निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे ज्या 600 शेतकऱयांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूंची जबाबदारीहि मोदींनी आपल्यावर घ्यावी. हे कायदे करुन देशातील शेतकऱ्याला वेठीस धरले गेले होते. त्याला कोण जबाबदार आहे?”, असा सवालही वडेट्टीवार यांनी केला.