जळगाव : हॅलो महाराष्ट्र – भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन (girish mahajan) यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. सकाळपासून तोंड मोकळं सोडायचं व जिभेला हाड नाही म्हणून काहीही बोलायचं, हा संजय राऊत यांचा धंदा झाल्याची टीका मंत्री गिरीश महाजन (girish mahajan) यांनी केली आहे. तसेच रोज सकाळी बातमी पाहिजे म्हणून ते काहीही बोलतात, त्यामुळे संजय राऊत हा गांभीर्याने घेण्यासारखा विषय नाही असा टोलादेखील मंत्री गिरीश महाजन (girish mahajan) यांनी लगावला आहे.
तसेच खोक्यांचा आणि दिशा सालियानचा काही संबंध आहे का? असा सवालदेखील गिरीश महाजन यांनी यावेळी उपस्थित केला. काहीही बोला, खोटं बोल पण रेटून बोल अशी सध्या राऊत यांची अवस्था असल्याचे महाजन (girish mahajan) म्हणाले आहेत. तुम्ही आता काहीही बोला ते आता लोकांना पटणार नाही. कारण लोक ऐकूण बोअर झाले असल्याचा खोचक टोलादेखील महाजन यांनी लगावला आहे.
दिशा सालियान प्रकरणावर महाजनांची प्रतिक्रिया
यादरम्यान मंत्री गिरीश महाजन (girish mahajan) यांनी दिशा सालियान प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. दिशा सालियन हा विषय वेगळा आहे, त्यावर आतापर्यंत चौकशी झाली नव्हती. मात्र आता चौकशीची मागणी करण्यात आल्याने या प्रकरणाची SIT चौकशी करण्यात येणार असल्याचे महाजनांनी सांगितले आहे.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय