कोल्हापूर । ‘भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची अवस्था मानसिक संतुलन ढासळलेल्या मनोरुग्णासारखी झाली आहे. महाराष्ट्रातील सत्ता गेल्याने चंद्रकांत पाटील ते असे वक्तव्य करत आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखं खुळ्यासारखं बडबडत आहेत,’ अशी घणाघाती टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.
काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर खोचक टीका केली होती. त्या टीकेवरुन मुश्रीफ यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला.बहुजनांचे नेतृत्व म्हणून शरद पवार यांनी नवा महाराष्ट्र घडविला आहे. त्यांनी लोकसभेच्या 10 ते 12, विधानसभेच्या 10 ते 12, निवडणुका जिंकल्या आहेत. देशाचे कृषी मंत्री, संरक्षण मंत्री या पदांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दिलेले योगदान निश्चितच मोठे आहे. राज्यात आणि केंद्रातही विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी काम केले. तसेच ते एकदाही पराभूत झालेले नाहीत.
महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळे चंद्रकांत पाटलांची अवस्था मानसिक संतुलन ढासळलेल्या मनोरुग्नासारखी……
चंद्रकांत पाटील डोक्यावर परिणाम झाल्यासारखे खुळ्यासारखं बडबडत आहेत!
चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेबद्दल घेतला खरपूस समाचार👇https://t.co/BUhipvCeaE pic.twitter.com/pP4Qcn6DeE— Hasan Mushrif (@mrhasanmushrif) November 23, 2020
चंद्रकांत पाटील यांनी काहीही न करता त्यांना एकदा नव्हे दोनदा केवढी मोठी संधी मिळाली होती. ते किती भाग्यवान आहेत. पण या सगळ्याचा राज्याला तर सोडाच कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा काहीही उपयोग झालेला नाही, असा टोलाही हसन मुश्रीफ यांनी लगावला
काय म्हणाले होते चंद्रकांत दादा?
राजकारणात येण्यापूर्वी शरद पवार मला खूप मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर ते खूप छोटे नेते असल्याचं दिसून आलं. त्यांचा अभ्यास नसतो, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र अभ्यासू नेते आहेत, असं पाटील म्हणाले होते. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं.
यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यावर सारवासारव करत केलेल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं, “मला पवार साहेबांबद्दल चुकीचं बोलायचं नव्हतं. पण तुम्ही मोदींवर, शाहांवर बोलता ते चालतं. देवेंद्र फडणवीस यांना टरबूज्या म्हणता ते चालतं, मला चंपा म्हणतात ते चालतं का?” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. (Hasan mushrif Criticizes Chandrakant Patil)
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’