हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आजपासून दोन दिवशीय जन-आशिर्वाद यात्रा सुरू होत आहे. आज सकाळी साडे अकरा वाजता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे मंत्री राणे दाखल झाले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. “उद्धव ठाकरे यांचे हे ठाकरे सरकार महाराष्ट्राला उध्वस्त करायला निघाले असल्याची टीका मंत्री राणे यांनी केली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन-आशिर्वाद यात्रेला सकाळी साडेअकरा वाजता सुरुवात झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखविला. यावेळी मंत्री राणे म्हणाले की, “जनता आताच्या सरकारला कंटाळलेली आहे. हे सरकार कोणत्याही प्रकारचा जनतेचा विकास करू शकत नाही. उद्धव ठाकरेंच्या सत्तेला जनता कंटाळलेली आहे. त्यामुळे जनता आता आशेच्या किरणाने आमच्याकडे बघत आहे, असे राणे यांनी सांगितले.
यावेळी नारायण राणे म्हणाले की, “मला जे पद मिळालेले आहे ते या जनतेच्या आशीर्वादाने मिळालेले आहे. मी महाराष्ट्राचे नाव हे दिल्लीत केल्याशिवाय राहणार नाही, अशी मी खात्री देतो. मी महाराष्ट्रात आलोय जनतेचे आशीर्वाद घ्यायला. फडणवीसांनी ज्या उद्धेशाने मला मोदींच्या मंत्रिमंडळात पाठवले आहे. तो नक्कीच पूर्ण करणार आहे.
ययावेळी मंत्री राणेंनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केली. ते म्हणाले की, आपल्याला आता महाराष्ट्राला वाचवायचे आहे. हे सत्तेवर असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे सरकार महाराष्ट्राला उध्वस्त करायला निघालेले आहेत. त्यांना यामध्ये यशस्वी होऊ द्यायचे नसल्याची टीका मन्त्र राणेंनी यावेळी केली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.