सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
शिंदे गटाचे नेते तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी खासदार संजय राऊत यांना थेट आव्हान दिले आहे. “आमच्या जीवावर तुम्ही खासदार झालात. त्या खासदारकीचा तुम्ही राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुकीत निवडुन येवुन दाखवावे,” असे मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हंटले आहे.
मंत्री शंभूराज देसाई यांनी आज सातारा येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, संजय राऊतांच्या विधानाकडे आम्ही काहीच गांभीर्याने पाहत नाही. सनी राऊतांना एवढंच सांगतो कि त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या खासदारकीची चिंता करण्यापेक्षा त्यांनी जे काही लोकांच्यातून निवडून आलेले नाहीत. सामान्य निवडणुकीतची राऊत निवडून आलेले नाहीत. ते ज्या ज्यावेळी खासदार झाले तर राज्यसभेतून झाले.
संजय राऊत यांना जर एवढीच चिंता करण्यापेक्षा सहा महिन्यापूर्वी आमच्या आमदारांच्या मतावर तुम्ही खासदार म्हणून निवडून आलात. आता तुम्ही राजीनामा द्या. आणि परत राज्यसभेवर तरी निवडून येऊन दाखवा. एवढीतरी धमक दाखवा. तुम्ही म्हणता ना स्वताला राष्ट्रीय प्रवक्ते आहात. तर मग आमच्या कल्याणच्या जागेची चिंता करण्यापेक्षा आता तुम्ही राजीनामा द्या. आणि परत निवडून येऊन दाखवा. म्हणजे तुम्हाला कळेल कि तुम्ही आकाय बोलता त्यामध्ये किती तत्थ आहे.
संजय राऊतांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावं; मंत्री शंभूराज देसाईंचे आव्हान pic.twitter.com/gYgBbW4rPc
— santosh gurav (@santosh29590931) January 28, 2023
डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या खासदारकीबद्दल बोलायचे झाले तर मी त्या जिल्ह्याचागेली सहा महिने झाले पालकमंत्री आहे. त्यांच्यात कामासाठी असणारी तळमळ त्या कामासाठी केला जाणारा पाठपुरावा जवळणे मी पाहिली आहे. त्यांनी त्यांच्या मतदार संघात खूप कामे केली आहेत. संजय राऊतांनी एकदा त्या मतदार संघात जाऊन पाहणी करावी. म्हणजे त्यांना कळेल कि आपण केलेले विधान हे किती हास्यास्पद आहे, असे मंत्री देसाई यांनी म्हंटले.
सी वोटरने केलेला सर्वे अनेक राज्यात चुकीचा : मंत्री शंभूराज देसाई
सी वोटरने केलेले सर्व सर्वे पूर्णपणे चुकीचे आहे. गोवा विधानसभा, मणिपूर विधानसभा, पंजाब विधानसभा, उत्तरप्रदेश विधानसभा, उत्तराखंड विधानसभा एवढ्या सर्व विधानसभांचा निकाल हा सी वोटरने चुकीचा दिला आहे हे मोठे उदाहरण आहे. त्यामुळे आता दिलेल्या सर्वेकडे आम्ही गांभीर्याने बघत नसतो, असे मत मंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केले.