राज्यात लवकरच नवी नियमावली?? वडेट्टीवारांचे मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात ओमीक्रोन या कोरोनाच्या नव्या व्हेरीएन्टचा शिरकाव झाला कर्नाटक येथे 2 रुग्ण सापडले आहेत. या घटनेने सगळीकडे खळबळ उडाली असून आता खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकार काय नवीन नियमावली जाहीर करणार का असा सवाल काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना विचारले असता त्यांनी सूचक इशारा दिला.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, “या राज्यातील नागरिकांची सुरक्षा करणं सरकारचं काम आहे. मुख्यमंत्री याबाबत संवेदनशील आहेत. मुख्यमंत्री तज्ज्ञांशी चर्चा करत असून दोन दिवसांमध्ये नियमावलीसंबंधी निर्णय होईल. ओमायक्रॉनसंबंधी लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण केलं जात असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

ते पुढे म्हणाले, लोकांनी घाबरुन जाऊ नये. ओमायक्रॉनसंबंधी लोकांमध्ये फार दहशतीचं वातावरण निर्माण केलं गेलं असं माझं स्पष्ट मत आहे. म्युकरमायकोसिसची जितकी तीव्रता होती किंवा जेवढं नुकसान होत होतं तसं यात काही नाही. लोकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही

You might also like