अल्पवयीन मुलाने केली मित्राची हत्या, शवविच्छेदन रिपोर्ट पाहून सगळ्यांनाच बसला धक्का

murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – वॉशिंग्टन शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाने आपल्याच मित्राची चाकू भोसकून हत्या केली आहे. यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे आरोपीदेखील अल्पवयीन मुलगा आहे. हि घटना अमेरिकेच्या फ्लोरिडी या ठिकाणी घडली आहे.

मृत मुलाचे नाव ट्रिस्टिन बॅली असून आरोपीचे नाव एडन आहे. पोलिसांनी या प्रकरणात एडनला अटक केली आहे. एडनवर आरोप करण्यात आला आहे कि त्याने ट्रिस्टिनवर चाकूने 114 वेळा वार केले आहेत. यामध्येच ट्रिस्टिनचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान वकिलांनी सांगितले कि, ट्रिस्टिन आणि एडन यांच्यात लहान मुलांमध्ये होणारी भांडणं सुरू झाली. मात्र, त्याचा शेवट अत्यंत भयानक पद्धतीने झाला आहे. हि हत्या एवढ्या भयानक पद्धतीने केली होती कि एडनला अल्पवयीन असूनही शिक्षेत कोणतीही सूट मिळणार नाही.

ज्यावेळी ट्रिस्टिनचा शवविच्छेदन अहवाल समोर आला तेव्हा सगळेच हादरून गेले. या अहवालात ट्रिस्टिनच्या शरीरावर 114 वार करण्यात आले होते. हे सर्व वार चाकूने केले होते. यामधील 49 वार ट्रिस्टिनच्या हातावर आणि डोक्यावर होते. पोलिसांनी आरोपीला अटक करून या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेत वापरण्यात आलेला चाकू पोलिसांनी जप्त केला आहे. चाकुचा पुढील टोकदार भाग तुटला असून हा भाग शवविच्छेदनादरम्यान ट्रिस्टिनच्या शरीरात आढळून आला. या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा देण्यात येणार आहे.