जळगाव हादरलं ! अल्पवयीन मुलीला पळवून नेत कारमध्ये केला अत्याचार

rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका नराधमाने गावात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर शारीरिक अत्याचार केले आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात हि धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारी 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच या प्रकरणी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामनेर तालुक्यातील एका गावात हि पीडित 15 वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबीयांसह राहते.

याच गावातील गणेश शांताराम पवार या नराधमाने पीडित अल्पवयीन मुलीला 8 मार्च रोजी रात्री 11.30 वाजता घरातून फूस लावुन पांढऱ्या गाडीत पळवून नेले. त्यानंतर त्याने एका गावाजवळील निर्जन रस्त्यावर गाडी थांबवून तिच्यावर गाडीतच अत्याचार केला. यानंतर पीडित मुलीने यासंदर्भात पहूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपी नराधमाविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीवरून संशयित आरोपी गणेश शांताराम पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.