उपाशी पोटी गोठ्यात झोपवल्याचा बदल घेत लेकानं केली जन्मदात्या बापाची हत्या

murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

खेड : हॅलो महाराष्ट्र – खेड तालुक्यातील दावडी याठिकाणी एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलानं आपल्या बापाच्या डोक्यात लोंखडी रॉड घालून हत्या केली आहे. वडील दारू पिऊन येतात, विनाकारण शिवीगाळ करत मारहाण करत असतात याच रागातून मुलाने हे पाऊल उचलत आपल्या जन्मदात्याची हत्या केली आहे. या घटनेमुळे दावडी गावात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. खेड पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

संतोष वाघिरे असं हत्या झालेल्या वडिलांचं नाव आहे. दावडी गावच्या हद्दीतील कान्हुरमळा येथे मयत संतोष वाघिरे आपल्या 16 वर्षीय लहान मुलासोबत राहत होते. त्यांचा म्हशी पालन व दुग्ध व्यवसाय आहे. तर वाघिरे यांना दारूच व्यसन होतं. मागील बऱ्याच वर्षांपासून ते दारूच्या आहारी गेले होते. ते दररोज रात्री दारू पिऊन घरी येत असत अन् आपल्या अल्पवयीन मुलाला शिवीगाळ करून मारहाण करत असत.

या दरम्यान 10 ऑगस्ट रोजी मंगळवारी मृत वाघिरे यांनी आपल्या 16 वर्षीय मुलासोबत कुरापती काढून त्याला दिवसभर शिवीगाळ आणि मारहाण केली. हे कमी होते म्हणून मृत वाघिरे यांनी आपल्या मुलाला रात्री जेवायला न देता, गोठ्यात झोपायला भाग पाडलं. एवढंच नव्हे तर अंथरून-पांघरून देखील दिलं नाही. यानंतर उपाशी पोटी गोठ्यात झोपवल्याच्या रागातून 16 वर्षीय मुलानं रात्री अकराच्या सुमारास गोठ्यातील लोखंडी रॉडने आपल्या वडिलांच्या डोक्यात घाव घातला. हा घाव एवढा जोरदार होता कि वडील संतोष वाघिरे यांचा जागीच मृत्यू झाला. मोठा भाऊ आदिनाथ संतोश वाघिरे याच्या फिर्यादीवरून लहान भावाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.