सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरातील गणपती मंदिर, मिरजेतील गणपती मंदिर आणि तुंगचे हनुमान मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय संबंधित व्यवस्थापनांनी घेतला आहे. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत ही दोन्ही मंदिरे भक्तांची गर्दी टाळण्यासाठी बंद राहणार आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शाळा, महाविद्यालये, चित्रपट गृहे, नाट्यगृहे, मॉल आदी ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून सुरु झाली आहे. मात्र मंदिरांबाबतचा निर्णय झाला नव्हता. शहरातील गणपती मंदिरात महापालिकेच्या आरोग्य विभागाने काल औषध फवारणी करुन निर्जंतुकीकरण केले होते. पण, आज सकाळी गणपती पंचायतन संस्थेने गणपती मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
विजयसिंहराजे पटवर्धन यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सांगली आणि मिरजेतील मंदिर बंद करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सांगली व मिरजेतील गणपती पंचायतन संस्थान ट्रस्टचे गणपती मंदिर आजपासून भक्तांची गर्दी टाळण्यासाठी बंद करण्यात आले. गणपती मंदिरात सकाळी आणि संध्याकाळी आरतीवेळी गर्दी होते. तसेच मंगळवारी आणि शुक्रवारी मोठ्या संख्येने भक्तांची गर्दी होते. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी गणपती पंचायतन संस्थेने दोन्ही मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती गणपती पंचायतन संस्थान ट्रस्टतर्फे देण्यात आली.
तुंग येथील प्रसिध्द हनुमान मंदिरही बंद ठेवण्याचा निर्णय हनुमान देवस्थान समितीने घेतला आहे. या मंदिरात रोजच भक्तांची वर्दळ असते. मात्र, शनिवारी मोठ्या प्रमाणात पंचक्रोशीतून भक्त हनुमानाच्या दर्शनासाठी येतात. त्यावेळी मोठी गर्दी होते. त्याचबरोबर अन्नदानही सुरु असते. त्यामुळेही गर्दी होते. गर्दीमुळे भक्तांचा संपर्क वाढून विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्दी टाळावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्याला प्रतिसाद देत हनुमान देवस्थान समितीने ३१ मार्चपर्यंत मंदिर प्रवेश आणि अन्नदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
सांगली जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करून Hello News असा मॅसेज पाठवा.
कोरोनासंबंधीच्या या बातम्याही वाचा –
करोनामुळं सोने बाजारावर संक्रांत; ७५ टक्के मागणी घटली
करोनानं रस्त्यावर थुंकणं केलं महाग; भरावा लागणार १००० रुपये दंड
कोरोना नाही तर ‘या’ कारणामुळे बँका पुढच्या आठवड्यात चार दिवस बंद
दक्षता! केवळ १ रुपयात थर्मल स्क्रिनिंगद्वारे करा तापाची चाचणी
राज्यातील मास्कच्या वाढत्या मागणीवर मंत्र्यांनी ‘असा’ काढला मार्ग