तब्बल 13 दिवसांनी शोध : बेशुध्द अवस्थेत सापडले बेपत्ता पोलिस अधिकारी संग्राम ताटे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाटण तालुक्यातील मारूल मधील असलेले व जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे हे दि. 2 फेब्रुवारीच्या रात्रीपासून बेपत्ता झाले होते. त्यांच्या गायब झाल्याने पोलिस तसेच संबंधित विभागाकडूनही त्यांची शोधाशोध केली जात होती. दरम्यान, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे तब्बल तेरा दिवसानंतर संग्राम ताटे हे बेशुद्ध अवस्थेत सापडले असून त्यांना कराड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पाटण तालुक्यातील यशवंतनगर, येथील पोलीस अधिकारी संग्राम ताटे हे तेरा दिवसापूर्वी बेपत्ता झाले होते. त्यांच्या अचानक गायब होण्यामुळे जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ताटे यांचा शोध घेतला जात होता. जालना एसीबीत संग्राम ताटे हे कर्तव्य बजावत असताना त्यांना 20 दिवसांपूर्वीच प्रमोशन मिळाले होते. दरम्यान, त्यांची कोकण येथे बदली झाली होती. याच दरम्यान 2 फेब्रुवारी रोजी ते जालना येथील घरातून कामा निमित्त बाहेर पडले. मात्र, ते घरी परत आले नसल्याने अखेर त्यांच्या पत्नीने ताटे यांची शोधाशोध केली.

प्रसंगी त्यांनी पोलिसांशीही संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रीअधिक गतिमान केली. शिरवळ इथे एकजण बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे एका व्यक्तीला दिसून आले. यानंतर त्या व्यक्तीने बेशुद्ध अवस्थेतील व्यक्तीच्या हातावरील फोन नंबरवर संपर्क साधला असता तो संग्राम ताटे यांच्या पत्नीचा निघाला. त्यानंतर युवकाने त्याची माहिती त्यांना दिली असता त्यांनी तत्काळ कुटूंबीयांशी संपर्क साधला. आणि ताटे यांच्यावर सुरुवातीला प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्यांना कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

असा लागला ताटे यांचा शोध –

पोलिसांना याबाबात माहिती मिळताच पोलिसांनीही ताटे यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर जालना पोलीस ठाण्यात अधिकारी ताटे हे बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली. दरम्यान रविवारी (दि.13) दुपारी सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे एक जण एका व्यक्तीला बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्या व्यक्तीच्या हातावर मोबाईल नंबर लिहिल्याचे दिसून आले. संबधीत व्यक्तीने शिरवळ पोलीस ठाण्यात याबाबात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या व्यक्तीच्या हातावरील मोबाईल क्रमांकावर फोन केल्यावर संग्राम यांच्या पत्नीने तो फोन उचलला. संग्राम यांचे वर्णन सांगताच त्यांनी ओळखले. यानंतर त्यांच्या पत्नीने तातडीने याची माहिती कराड येथील कुटुंबियांनी दिली. संग्राम यांची माहिती मिळताच कुटुंबियांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

Leave a Comment