हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तामिळनाडू मध्येही ठाकरे पॅटर्न पाहायला मिळत आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. चेन्नईतील राजभवनात राज्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. राज्यपाल आर एन रवी यांनी उदयनिधी स्टॅलिन यांना पदाची शपथ दिली.
वडिलांसारखा पांढरा शर्ट परिधान करून उदयनिधी यांनी तामिळ भाषेत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या शर्टवर द्रमुकच्या युवा आघाडीचा लोगो छापलेला होता. 10 मिनिटांत शपथविधी सोहळा पार पडला. काँग्रेससह द्रमुकच्या इतर मित्रपक्षांचे नेतेही शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. तर तामिळनाडूतील प्रमुख विरोधी पक्ष AIADMK ने या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला.
तमिलनाडु: DMK की युवा शाखा के सचिव और मुख्यमंत्री एम.के. स्टालिन के बेटे उदयनिधि स्टालिन ने चेन्नई में राजभवन में राज्य मंत्री के रूप में शपथ ली। pic.twitter.com/A6DdnBfgmi
— ANI_HindiNews (@AHindinews) December 14, 2022
उदयनिधी स्टॅलिन यांचा संपूर्ण परिचय –
उदयनिधी स्टॅलिन हे स्टॅलिन कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीतील आहेत. 27 नोव्हेंबर 1977 रोजी जन्मलेल्या उदयनिधी यांनी तीन वर्षांपूर्वी म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी DMK युवा शाखेचे प्रमुख म्हणून राजकीय कारकीर्द सुरू केली. यादरम्यान त्यांनी राज्याचा दौरा करून पक्षाचा जोरदार प्रचार केला. राजकारणाव्यतिरिक्त, उदयनिधी यांनी अनेक तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे ज्यात त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.