हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नैतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर केला. राज्यातील आमदारांना आपल्या मतदार संघाचा विकासासाठी निधी उपलब्ध शासनाकडून करून देण्यात येत असतो. या निधीचा उपयोग लोकप्रतिनिधीना आपल्या मतदारसंघात विकासकाम करण्यासाठी होत असतो.
मतदार संघातील सार्वजनिक सेवा-सुविधा जनतेला पुरविण्यासाठी आमदार या निधीवर अवलंबून असतात. यंदाच्या राज्य अर्थसंकल्पात सरकारने आधी मिळणाऱ्या निधीत आता तब्बल १ कोटींची वाढ केली आहे. याधी सर्व आमदारांना २ कोटी निधी दिला जात होता त्यात आता १ कोटींची वाढ करत त्यांना आता ३ कोटी विकास निधी उपलब्ध होणार आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.