“मेरा साया भी बडा नमक हराम निकला…” आव्हाड यांचे अजित पवारांवर टिकास्त्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । “मेरा साया भी बडा नमक हराम निकला | दिन मे मेरे साथ था… रात मे कहीं ओर से निकला !!!” अशी शायरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या बंडखोरीवर सादर करीत त्यांच्यावर जोरदार टिका केली आहे. ‘महाविकासआघाडी’ची बोलणी अंतिम टप्प्यावर असतांना अचानकपणे एका रात्रीत होत्याच नव्हतं होत भाजप सोबत जात अजित पवार यांनी सकाळी उपमुख्यमंत्री पदाची शप्पथ घेतली.

राष्ट्रवादीचे अनेक नेते हे अजित पवार पुन्हा पक्षात येतील, त्याचं बंड मागे घेतील अशा आशेवर आहेत. कार्यकर्ते देखिल संभ्रमात आहेत, कारण कोणालाही पूर्व कल्पना नसतांना हा निर्णय घेण्यात आला होता. प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे देखिल अजित पवार यांनी बंड शमवून माघारी यावेत यासाठी अखेरची बोलणी करणार आहेत.

अजित पवार यांच्या सोबत शपथविधीला उपस्तिथ असलेले आमदार आता जाहिरपणे आम्ही ‘शरद पवार यांच्याच सोबत’ आहोत अशी भूमिका घेत आहे. मात्र अजूनही राज्यातील अनेक घडामोडी या अनिश्चितच आहेत. ‘ऑपरेशन लोटस’ च्या नावाखाली बीजेपी हे सत्ताकारण जुळवण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी चर्चा सध्या सुरू आहे. मात्र तोपर्यंत अजित पवार हे टिकेचे धनी राहतील हे मात्र खरे.



अजित पवार यांच्या बंडखोरीपूर्वीचे ट्वीट ; विधिमंडळ गटनेते पदाच्या शुभेच्छा देतांना.



Leave a Comment