सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा करिष्मा पहायला मिळत आहे. याचाच प्रत्यय कोरेगाव तालुक्यातील कुमठे गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत आला आहे. या ठिकाणी निवडणुकीत ट्वीस्ट निर्माण झाले आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे गटाचे 9 उमेदवार विजयी झाले आहेत तर शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे गटाला 6 जागा मिळाल्या आहेत. या ठिकाणी सरपंचपद मात्र, महेश शिंदे यांच्या विचारांचा निवडुन आला आहे.
कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे व शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या गटात काट्टे कि टक्कर पहायला मिळत आहे. या याठिकाणी दोन्ही शिंदेंकडून आपला उमेदवार विजय मिळवण्यासाठी खूप कष्ट घेण्यात आले आहेत. तालुक्यातील कुमठे ग्रामपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदारा महेश शिंदे यांच्या विचाराचा सरपंच निवडणून आला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारा शशिकांत शिंदे यांच्या गटाचे एकूण ९ उमेदवार तर महेश शिंदे गटाचे सहा उमेदवार निवडून आले आहेत.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून सातारा जिल्ह्याला ओळखले जाते. हा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निम्मिताने शिंदे गटाकडून खूप मेहनत घेण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून मविकास आघाडीतील पक्षांना शह देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आहे.