मुंबई : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात जवळीकता वाढली आहे. यावरुन मनसे-भाजप-शिंदे गटाच्या युतीची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात रंगू लागली आहे. यानंतर मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी मात्र स्पष्टपणे ही युती होण्यासंदर्भात समर्थन करताना मनसेनं भविष्यात शिंदे आणि फडणवीसांसोबत युती करायला हरकत नाही, असं मोठं वक्तव्य केले आहे. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा नाही का? राज ठाकरे यांचे आदेश आले तर नक्कीच युती करू, असं राजू पाटील (Raju Patil) म्हणाले आहेत.
शिंदे आणि फडणवीस सरकारकडून मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक पावलं
आमच्यासारख्या बाहेरून पाठिंबा असलेल्या पक्षांच्या मागण्या जर हे सरकार मान्य करत असेल, सकारात्मक प्रतिसाद देत असेल, तर जवळ येण्यास हरकत नाही, असे राजू पाटील म्हणाले. पूर्वीच्या सरकारमध्ये कुणी दखलच घेत नव्हतं. शिवाय एखादी मागणी केली की ती कशी पूर्ण होणार नाही, याकडे लक्ष दिलं जायचं, असा आरोपसुद्धा राजू पाटील (Raju Patil) यांनी यावेळी केला.
राज ठाकरे यांनी आदेश दिले तर आम्ही एकत्र यायला तयार आहोत
मनसे स्वबळावर लढणार आहे हे राज ठाकरे यांनी अगोदरच सांगितले आहे. मात्र तरीही भविष्यात तशी काही परिस्थिती निर्माण झालीच, तर एकत्र यायला हरकत नाही, असं राजू पाटील (Raju Patil) म्हणाले.
हे पण वाचा :
अंधेरीचा पहिला झटका … मशाल पेटली; सामनातून भाजपवर टीकेचा बाण
जालन्यामध्ये आयशर आणि रिक्षाचा भीषण अपघात! 5 जणांचा जागीच मृत्यू
5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये
Honda पुढील महिन्यात ACTIVA Electric करणार लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत अन् बरंच काही…VIP मोबाईल नंबर ‘फ्री’ मध्ये मिळवण्याची संधी